मंडणगड : निसर्ग चक्री वादळाचा मागील (nisarg cyclone) अनुभव लक्षात घेता तालुक्यातील पठारावरील व किनाऱ्यालगतच्या गावांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यावेळी तौक्ते वादळाच्या (tauktae cyclone update) पार्श्वभूमीवर बलदेवाडी, केंगवल, कांटे, गुडेघर या पठारावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्याचे बाणकोट पोलिस निरीक्षक (mandangad police) उत्तम पीठे यांनी सांगितले. तर समुद्र व खाडी किनाऱ्यावरील वेळास, बाणकोट, वेसवी, वाल्मिकीनगर, उमरोली गावांत ग्रामपंचायतीच्या (help of grampamchayat) मदतीने गाडीतून उद्घोषणा करून आवाहन करून सतर्क करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवें यांनी सांगितले.
वादळ या आपत्कालीन परिस्थितीत कसे सुरक्षित रहावे, कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. गुडेघर येथील मायनिंग कंपनीला विनंती करून लोडर व जेसीबी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर, घरावर झाडे पडल्यास सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कटर चालविणारे ३ वनविभागाचे कर्मचारी बाणकोट पोलिस स्टेशनला उपस्थित करण्यात आले आहेत. १५ मे रोजी रात्री परिसरात वीजा चमकून पावसाला सुरवात झाली. हवेत गारवा पसरला. तालुक्यात सर्वत्र पाऊस सुरु झाला.
निसर्ग चक्री वादळात पठार व खाडीलगतच्या परिसरात सर्वाधिक फटका बसला होता. त्यामुळे येथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे पोलिस निरीक्षकांनी सांगितले. गतवर्षीच्या वादळात वेळास गावाचे बागायती शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले होते. वादळाच्या पार्श्वभुमीवर तालुक्यात सकर्त राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या दरम्यान धोकादायक 508 घरातील नागरीकांचे पक्या घरांत स्थलांतर करण्यात आलेले असल्याचा संदेश समाज माध्यमात प्रसारीत करण्यात आला असला तरी प्रशासनाकडून या माहीतीसाठी अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
16 मे 2021 रोजी मंडणगड तालुक्यात झालेला पाऊस
मंडणगड 02 मि. मी
म्हाप्रळ 06 मि. मी
देव्हारे 08 मि. मी
वेसवी 11मि. मी
एकुण पाऊस 27 मि. मी. सरासरी 09 मि. मी.
नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण
निसर्ग चक्रीवादळाचा भयानक कटू अनुभव व आठवणी अजूनही ताजा असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत. त्यातच कोरोनाने जगणे मुश्किल केले आहे. अशातच आणखी एक संकट तौक्ते वादळाच्या रूपाने डोक्यावर घोंगावण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक पीठे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.