Mahad News : आधी मतदान नंतर रक्तदान, अनेक मतदारांनी केले रक्तदान

महाड येथील जनकल्याण रक्त केंद्रामध्ये उसाला दहा ते वीस हजार रक्ताची मागणी अनेक गरजूंकडून होत आहे.
lok sabha election first voting after blood donation mahad konkan
lok sabha election first voting after blood donation mahad konkanSakal
Updated on

Mahad News : एका बाजूला भारतीय लोकशाही मजबूत करण्याकरता मतदानाचा हक्क बजावणाऱ्या काही मतदारांनी आधी मतदान नंतर रक्तदान या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारीही पार पाडली.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान करणाऱ्यांची संख्या खूपच कमी होत असते. आणि त्या बदल्यात रक्ताची मागणी देखील वाढत असते. महाड येथील जनकल्याण रक्त केंद्रामध्ये उसाला दहा ते वीस हजार रक्ताची मागणी अनेक गरजूंकडून होत आहे.

ही गरज लक्षात घेता जनकल्याण रक्त केंद्राने आधी मतदान नंतर रक्तदान असे आवाहन मतदारांना केले होते. या आवाहनाला मतदारांनी चांगला प्रतिसादही दिला. आज सकाळी दहा ते दुपारी एक या वेळात 19 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

महाड मधील समीर सहस्रबुद्धे व ऋतुराज सहस्रबुद्धे या पिता पुत्रांनी मतदान केल्यानंतर रक्तदानही केले. भारतीय लोकशाही बळकट करण्याकरता मतदानाला प्राधान्य देत असताना अनेक मतदारांनी रुग्णहितालाही प्राधान्य देऊन रक्तदान केल्याबद्दल जनकल्याण रक्त केंद्रांकडून या सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रक्तदात्यांच्या संखेत आणखीन वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.