Loksabha Election : अजितदादांचा 'या' मतदारसंघावर दावा; 'महायुती'त मिठाचा खडा पडण्याची शक्यता, जागा वाटपावरून वाद

रायगड लोकसभा मतदारसंघावर (Raigad LokSabha Constituency) तिन्ही घटक पक्षांनी दावा केला आहे.
Raigad LokSabha Constituency
Raigad LokSabha Constituencyesakal
Updated on
Summary

भाजप आणि शिवसेना या घटक पक्षांशी चर्चा न करताच अजित पवार यांनी रायगडची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे.

चिपळूण : रायगड लोकसभा मतदारसंघावर (Raigad LokSabha Constituency) तिन्ही घटक पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रायगडच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणूक (Loksabha Elections) जशी जवळ येऊ लागली आहे, तसा सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांतील विसंवाद समोर येऊ लागले आहेत. लोकसभेच्या जागावाटपावरून तिन्ही पक्षांत असलेले मतभेद समोर येण्यास सुरवात झाली आहे. कोकणात फारसे संघटन नसले तरी रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे.

Raigad LokSabha Constituency
Bidri Factory Election Result : 'बिद्री'वर पुन्हा 'केपीं'चंच वर्चस्व! मुश्रीफ-बंटी पाटलांच्या साथीनं विरोधकांचा धुव्वा, सर्व 25 जागांवर विजय

गेल्या पाच वर्षांत विविध पक्षांतील असंतुष्टांना पक्षात घेऊन आपली ताकद वाढवण्याचे काम पक्षाने सुरू केले आहे. पेण विधानसभा मतदारसंघ जिंकल्यामुळे पक्षाच्या महत्त्वाकांक्षेला बळ मिळाले आहे. शेकापच्या धैर्यशील पाटील आणि दिलीप भोईर यांना पक्षात घेऊन भाजपने मतदारसंघ बांधणीला सुरवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महासंकल्प २०२४ यात्रेअंतर्गत रायगडचा दौरा केला. या वेळी अलिबाग येथे रॅली काढून त्यांनी सभा घेतली.

या वेळी अलिबागच्या विधानसभा मतदारसंघासह रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले होते. धैर्यशील पाटील यांना खासदार करायचे आहे की, नाही असा सवाल त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केला होता. त्यानंतर अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वैचारिक मंथन मेळावा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे झाला.

Raigad LokSabha Constituency
जातभावना प्रबळ होत असतानाच बाबासाहेबांच्या 'या' पुस्तकाची वाढतेय मागणी; मराठी पुस्तकाच्या छापल्या तब्बल 50 हजार प्रती

या वेळी चार लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला. ज्यात रायगड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. साहजिकच या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख दावेदार असणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या घटक पक्षांशी चर्चा न करताच अजित पवार यांनी रायगडची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. दुसरीकडे शिवसेनेचा शिंदेगटही या मतदार संघासाठी आग्रही आहे.

अलिबाग येथे ग्रामपंचायत निवडणुकानंतर झालेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेनेने रायगडची लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केली. शिवसेनेचे अनंत गीते या मतदारसंघातून निवडणूक लढवत आले आहेत. मतदारसंघात शिवसेनेचे सर्वाधिक विधानसभेचे आमदार आहेत, यामुळे शिवसेनेने या मतदारसंघाची निवडणूक लढवावी.

Raigad LokSabha Constituency
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा गहाळ; कोणत्याच यंत्रणेकडे मूळ प्रत नाही उपलब्ध!

मतदारसंघाची रचना आणि पक्षीय बलाबल

रायगड लोकसभा मतदारसंघाची २००८ मध्ये पुनर्रचना झाली. यात रायगड जिल्ह्यातील ४ तर रत्नागिरीतील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश केला. यात रायगडमधील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरीतील गुहागर, दापोली या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. सहापैकी अलिबाग, महाड आणि दापोली हे तीन विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. पेण मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. गुहागरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.