PM मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांची मने जुळवणार; आमदार नितेश राणेंचा निर्धार

लोकसभा निवडणूक (LokSabha Elections) महायुती म्हणून लढविणार आहोत.
LokSabha Elections Nitesh Rane
LokSabha Elections Nitesh Raneesakal
Updated on
Summary

लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून सहा लाख मते आपली आहेत, असा दावा करण्यात आला तर भाजपकडून आठ लाख मते असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे हात बळकट करण्यासाठी महायुती सरकारचे कार्यकर्ते एकत्रित येऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य घेऊन उमेदवार लोकसभेत पाठवणार आहेत. यासाठी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मने जुळवून एकत्रित लढा देण्याचे निश्चित केले आहे. म्हणूनच येत्या १४ ला कणकवलीत भगवती मंगल कार्यालयात महायुतीचा पहिला संयुक्त मेळावा आयोजित केला असल्याची माहिती महायुतीचे (Mahayuti) समन्वयक आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून दिली.

LokSabha Elections Nitesh Rane
लोकसभेसाठी सातारा-माढा मतदारसंघातील उमेदवार कोण, जागा कोणाला? शिवेंद्रराजेंनी चेहऱ्यावर हास्य आणत सांगितला 'उमेदवार'

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापू लागले असून राज्यात सत्तेत असलेले शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (Ajit Pawar Group) एकत्रित येऊन लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित केले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी येथे आयोजित पत्रकार परिषदेला प्रभाकर सावंत, संजय आंग्रे, अबिद नाईक, काका कुडाळकर, अशोक दळवी आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार राणे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणूक (LokSabha Elections) महायुती म्हणून लढविणार आहोत. तीन पक्षाच्या प्रमुखांनी तो निर्णय जाहीर केला आहे. तीन पक्षाच्या संयोजकपदी आपली निवड केली आहे. कणकवलीच्या भगवती मंगल कार्यालयात होणाऱ्या या संयुक्त मेळाव्याला भाजपचे वरिष्ठ नेते प्रसाद लाड यांच्यासह सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.”

या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असणार याबाबत प्रत्येक पक्षाचे नेते दावा करत आहेत, असे विचारले असता श्री. राणे म्हणाले, “प्रत्येक पक्षाचा तो अधिकार आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार असावा, अशी मागणी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची असते. तशीच मागणी आतापर्यंत भाजप, शिवसेना या पक्षाच्या प्रमुखांनी केली आहे. प्रत्येकाने मताची आकडेवारीची बेरीज ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, याचा अर्थ ठराविकच पक्षाला उमेदवारी दिली जाईल असा नाही.

LokSabha Elections Nitesh Rane
Hasan Mushrif : 'मी आणि संजय घाटगेंनी सर्व निवडणुकांत एकत्र काम करण्याची शपथ घेतलीये, आमच्या मैत्रीला दृष्ट लागू नये'

तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि केंद्रातील नेते याबाबत योग्य तो निर्णय घेऊन, जो उमेदवार या मतदारसंघासाठी मिळेल, त्या उमेदवाराला निवडून आणणे ही आमची महायुतीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी राहील. हा मतदारसंघ आतापर्यंत विरोधी पक्षाकडे राहिला आहे. मात्र, यापुढे मोदींच्या सभागृहात या मतदारसंघाचा खासदार असेल.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाईक म्हणाले, ‘‘पक्षाच्या वरिष्ठांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे तो आम्हा सर्वांना मान्य आहे. आम्ही आता लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. उमेदवार कोण? त्यापेक्षा आपण महायुतीने दिलेला उमेदवार निवडून आणायचा आहे. इतकेच उद्दिष्ट आमच्यासमोर आहे. त्या अनुषंगाने या मेळाव्याला तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन सहभाग घेतील. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढणार आहोत.’’

LokSabha Elections Nitesh Rane
कायदेशीर प्रक्रियेनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान पाडली; बेडग ग्रामपंचायतीचा मोठा दावा

राऊतांकडून केवळ विरोधाचेच काम

कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आजवर शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे गट) सातत्याने विरोध झाला आहे. रिफायनरी प्रकल्प असू दे किंवा पूर्वीचा सी-वर्ल्ड प्रकल्प. सातत्याने विरोधाची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे येथे विकासात्मक कामे होण्यासाठी हक्काचा खासदार असायला हवा. देशात विकासाची प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत आपण मागे पडत आहोत. कारण खासदार विनायक राऊत यांनी केवळ विरोधाचेच काम केले आहे. हा शिक्का आम्हाला पुसायचा आहे. म्हणून आम्ही एकत्रित ही निवडणूक लढवत आहोत, असे श्री. राणे यावेळी म्हणाले.

LokSabha Elections Nitesh Rane
Kolhapur Politics : एकाच प्रसिद्धी पत्रकावर कट्टर विरोधक सतेज पाटील, धनंजय महाडिकांचे झळकले PHOTO, लोकांना बसला धक्का

आकडेवारी न पाहता उमेदवार निवडून आणू

लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून सहा लाख मते आपली आहेत, असा दावा करण्यात आला तर भाजपकडून आठ लाख मते असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुळात या मतदारसंघाची एकूण संख्या पाहता हे दावे फसवे आहेत, असा सवाल उपस्थित केला असता आमदार राणे म्हणाले, “आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक पक्षाचा उमेदवार असावा, असे वाटत आहे. त्यामुळे हा दावा केला जात असला तरी आमच्या वरिष्ठांना या आकडेवारीची पूर्ण जाण आहे. त्यामुळे या आकड्यांपेक्षा आम्हाला जो उमेदवार देतील तो निवडून आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.