Loksabha Election Mahavikas Aghadi ShivSena
Loksabha Election Mahavikas Aghadi ShivSenaesakal

Loksabha Election : महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित! लोकसभेच्या 'या' दोन्ही जागा ठाकरेंकडे, ही नावं चर्चेत

लोकसभेतील जागा वाटप निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीकडून समिती स्थापन करण्यात आली होती.
Published on
Summary

काँग्रेस, राष्ट्रवादीकडे लोकसभेसाठी कोकणात नेतृत्वाचा आभाव आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला होता.

चिपळूण : लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. त्यात कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगडची जागा शिवसेनेच्या वाट्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.

राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रित लढणार असल्याच्या तयारीत आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामाना आगामी निवडणुकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Loksabha Election Mahavikas Aghadi ShivSena
Maratha Reservation : PM मोदींना भेटल्यावरच मराठा आरक्षणाचा तोडगा निघेल, अन्यथा..; काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

यातच आता लोकसभेतील जागा वाटप निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीकडून समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत महाविकास आघाडीतील प्रत्येकी तीन तीन नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई तर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील, नसीम खान आणि राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांचा समावेश करण्यात आला होता.

Loksabha Election Mahavikas Aghadi ShivSena
Raju Shetti : फक्त आठ दिवस थांबा, सगळे साखर कारखानदार गुडघे टेकतील; राजू शेट्टींचा स्पष्ट इशारा

तीनही पक्षाच्या प्रत्येकी तीन नेत्यांनी जागावाटपाची अंतिम बोलणी केल्यानंतर दिवाळी सुरू असताना महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणातील दोन्ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या आहेत. कोकणात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मतदार वर्ग कोकणात मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेबरोबर राहिल्यास महायुतीबरोबर चुरशीची लढत होईल.

Loksabha Election Mahavikas Aghadi ShivSena
Loksabha Election : भाजप निंबाळकरांचं तिकीट कापणार? मोहिते-पाटलांच्या 'या' घोषणेमुळं राजकीय चर्चांना उधाण

काँग्रेस, राष्ट्रवादीकडे लोकसभेसाठी कोकणात नेतृत्वाचा आभाव आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला होता. त्यामुळे कोकणातील दोन्ही जागा आता शिवसेनेच्या गटाला मिळाल्या आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार विनायक राऊत आणि रायगड लोकसभा मतदार संघातून माजी खासदार अनंत गीते यांची नावे चर्चेत आहेत. कोकणातील दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.