Loksabha Election : अजितदादांचा भाजपला पाठिंबा मिळताच लोकसभेचं बदललं चित्र; राऊतांची वाढणार डोकेदुखी

खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांना या घडामोडीचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
Loksabha Election Ratnagiri-Sindhudurg
Loksabha Election Ratnagiri-Sindhudurgesakal
Updated on
Summary

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनीही अजित पवार यांना साथ दिली.

चिपळूण : राज्यात भाजपला (BJP) राष्ट्रवादीची साथ मिळाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप आणखी मजबूत होणार आहे.

खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांना या घडामोडीचा सर्वाधिक फटका बसणार असून या मतदारसंघातून खासदार राऊत यांना हॅट्ट्रिक साधण्यासाठी परिश्रम करावे लागणार आहेत.

Loksabha Election Ratnagiri-Sindhudurg
Kagal Politics : 'सासूसाठी भांडत बसलो अन् सासूच वाट्याला आली'; मुश्रीफांच्या भूमिकेमुळं समरजितांची मोठी कोंडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात आलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातही बसले आहेत. खासदार विनायक राऊत यांची डोकेदुखी वाढणार आहे.

विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून दोनवेळा निवडून गेले. २०१४ मध्ये त्यांना मोदी लाटेचा फायदा झाला. २०१९ मध्येही त्यांनी दणदणीत विजयी मिळवला. २०२४ मध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी त्यांची मोर्चेबांधणी सुरू होती.

Loksabha Election Ratnagiri-Sindhudurg
Karad : एकनाथ शिंदेंना बाजूला करुन अजित पवारांना मुख्यमंत्री करतील; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर खासदार राऊत यांचा विजय सहज मानला जात होता. कोकणातून पूर्वी सुरेश प्रभू आणि अनंत गीते सलग निवडून आले होते. त्यांच्यानंतर खासदार राऊत यांच्या नावे हा विक्रम होणार होता; परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार राऊत यांची डोकेदुखी वाढली होती.

फुटलेल्या शिवसेनेतून रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक आहेत. ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल; मात्र खासदार विनायक राऊत हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार होते.

Loksabha Election Ratnagiri-Sindhudurg
Satara Politics : शरद पवार की अजित पवार? NCP पदाधिकाऱ्यांत द्विधावस्था; मुंबईत आज दोन्ही गटांची स्वतंत्र बैठक

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप आणि फुटलेल्या शिवसेनेची मते एकत्र होणार आहेत. काँग्रेस, राष्टवादी, वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेची मते एकत्र होणार होती. या मतदार संघातील सहापैकी वैभव नाईक, राजन साळवी हे दोन आमदार ठाकरे गटाचे आहेत.

नितेश राणे भाजप आणि राष्ट्रवादीचे शेखर निकम असे प्रत्येकी एक आमदार आणि फुटलेल्या शिवसेनेचे दीपक केसरकर, उदय सामंत असे दोन आमदार आहेत. ठाकरे गटापेक्षा भाजप एक पाऊल पुढे वाटत असताना चिपळूणची राष्ट्रवादी खासदार राऊत यांच्याबरोबर राहिली असती तर त्यांना मोठा आधार मिळाला असता.

परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनीही अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे.

Loksabha Election Ratnagiri-Sindhudurg
Ajit Pawar : बंडानंतर पक्षात दोन गट, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष कोण? उत्सुकता शिगेला

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निवडून आणण्याचे आमचे स्वप्न आहे. भाजपचाच उमेदवार निवडून येईल हे निश्चित आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. सामान्य मतदारही भाजपला साथ देतील, यात शंका नाही.

-वसंत ताम्हणकर, तालुकाध्यक्ष, चिपळूण भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.