Uday Samant : 'आम्हाला गद्दार-खोकेबहाद्दर म्हणाले, आता हिम्मत असेल तर अजितदादांवर टीका करून दाखवा'

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचा काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत.
LokSabha Election Uday Samant
LokSabha Election Uday Samant esakal
Updated on
Summary

आमच्या जीवावर निवडून आलेले आता कृतज्ञता म्हणून आमच्यावर टीका करत असतील, तर त्यांना करारा जवाब मिळेल.

रत्नागिरी : माझ्यावर चांगले संस्कार झाले म्हणून मी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही. परंतु, पाणी डोक्यावरून गेले तर गप्प बसणार नाही, असा इशारा उदय सामंत (Uday Samant) यांनी दिला.

विधानसभेच्या आधी चार महिने लोकसभेची निवडणूक आहे. तेव्हा मी बरोबर होतो म्हणून खासदारकी मिळाली. आता पुढचा खासदार कोण होतोय ते बघूच, अशी टीकाही पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांचे नाव न घेता केली.

आमच्या जीवावर निवडून आलेले आता कृतज्ञता म्हणून आमच्यावर टीका करत आहेत. मग त्यांना करारा जवाब मिळेल. रत्नागिरी सोडण्याची वेळ आताच काहींवर आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. वि. दा. सावकर नाट्यगृहामध्ये आयोजित शहर शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

LokSabha Election Uday Samant
Loksabha Election : माढ्याचा पुढील खासदार काँग्रेस पक्षाचाच असेल; माजी मुख्यमंत्र्यांचं थेट भाजपलाच चॅलेंज

ते म्हणाले, काही लोक विनाकारण आमच्यावर टीका करत आहेत. परंतु, त्या टीकेला या उपस्थित गर्दीने उत्तर दिले आहे. शहर शिवसेनेचेच आहे, यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. आमच्या जीवावर निवडून आलेले आता कृतज्ञता म्हणून आमच्यावर टीका करत असतील, तर त्यांना करारा जवाब मिळेल.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचा काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत. काहीजण सकाळी बोलतात आणि रात्री आम्हाला भेटतात. परंतु, आता चिंता करण्याची गरज नाही, शिवसेनेच्या मागे संपूर्ण शहर आहे. कोरियामधून मी चेष्टा म्हणून काही पदाधिकाऱ्यांना सुनावले, ते एवढे पेटून उठले आणि खरेच बोललो तर विरोधकांची पळताभुई थोडी होईल.

काहीजण माझ्याविरोधात उमेदवार शोधण्यासाठी मुंबईला गेले आणि राजापूरचे उमेदवार निश्चित करून आले. काही लोक बंद दरवाजा करायचे आणि राजन साळवी किती वाईट हे ठाकरेंना सांगायचे, अशी यांची नीतिमत्ता आहे. याला काळच उत्तर देईल. मी जर तोंड उघडले तर अनेकांची गोची होईल. परंतु, मी राजकारणात काही तत्त्वे पाळतो; पण आता जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकेल, पण तो आमचा.

LokSabha Election Uday Samant
Shivsena Politics : एकनाथ शिंदे सुद्धा 'मातोश्री'वर माफी मागायला आल्यास..; राऊतांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलं मोठं विधान

जिल्हा परिषद, पंचायत समिती आपली असेल. रत्नागिरी पालिकेत पंचवीसहून अधिक आपले नगरसेवक असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक चार महिने आधी आहे. तेव्हाच कळेल कुणाची ताकद आहे. जे टीका करतात त्यांना नियतीदेखील माफ करणार नाही. अनेकजण आम्हाला गद्दार, खोकेबहाद्दर म्हणाले. आता हिम्मत असेल तर अजित पवार यांच्यावर टीका करून दाखवा.

LokSabha Election Uday Samant
Thane Politics : शंभूराज देसाईंना डावललं? भाजपच्या चव्हाणांना मिळाला झेंडावंदनाचा मान, पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

शिवसेना हे आपले कुटुंब आहे, कुटुंबात दगाबाजी करणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. विकासाला निधी कमी पडू देणार नाही. आपण विकासाच्या माध्यमातून टीकेला उत्तर देऊ, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, उद्योजक अण्णा सामंत, राजन शेट्ये, अॅड. संकेत घाग, श्री. सोलकर आदी व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LokSabha Election Uday Samant
National Anthem : बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'त्यांनी' गायिलं राष्ट्रगीत अन् जगभरात उमटला कोल्हापुरी ठसा!

आज प्रचंड जोश आलाय - पंडित

मी एवढ्या दिवस शांत होतो. परंतु, आज प्रचंड जोश आला आहे. गल्लीत उभा राहिला तरी निवडून येण्याची ताकद नाही, असे लोक उगाच बोलत आहेत. मी गरीब आहे, म्हणून बोलता. साहेबांवर बोलून दाखवा, असे प्रतिउत्तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी ठाकरेसेनेचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांना नाव न घेता दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.