महानिर्मिती कंपनीत होणार २६२० पदावर कामगार भरती

महानिर्मिती कंपनीला आर्थिक संकटासह कर्मचारी तुटवड्याचे संकटही सहन करावे लागत आहे. २०२२ या वर्षी कंपनीतील शेकडो कामगार सेवानिवृत्त होणार आहेत.
Electricity
ElectricitySakal
Updated on
Summary

महानिर्मिती कंपनीला आर्थिक संकटासह कर्मचारी तुटवड्याचे संकटही सहन करावे लागत आहे. २०२२ या वर्षी कंपनीतील शेकडो कामगार सेवानिवृत्त होणार आहेत.

चिपळूण - महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती (Mahagenco) कंपनीमध्ये लवकरच विविध पदांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment Process) राबवली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया महानिर्मिती कंपनीमार्फत होणार की खासगी कंपनीमार्फत याची सर्वांना उत्सुकता आहे. प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीत नोकरीची (Jobs) मोठी संधी (Opportunity) उपलब्ध होणार आहे.

महानिर्मिती कंपनीला आर्थिक संकटासह कर्मचारी तुटवड्याचे संकटही सहन करावे लागत आहे. २०२२ या वर्षी कंपनीतील शेकडो कामगार सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे कामगारटंचाई भासणार आहे. त्यामुळे महानिर्मिती कंपनीकडून यावर्षी नोकरभरती केली जाणार आहे. महाजनको कंपनीत थेट भरती प्रक्रियेतून २ हजार ६२० पदे रिक्त आहेत. डिसेंबर २०२२ अखेर २१४ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे कामगारटंचाईची मोठी समस्या महाजनको कंपनीत निर्माण होणार आहे. आरक्षणाच्या प्रश्नामुळे पदोन्नतीची प्रक्रियाही अडकली आहे. आरक्षणाच्या माध्यमातून पदोन्नती दिल्या जाणाऱ्या २ हजार ७० जागाही रिक्त आहेत.

महाजनकोमध्ये नोकरभरती व्हावी, यासाठी विविध कामगार संघटनांकडून पाठपुरावा सुरू आहे तसेच प्रकल्पग्रस्तांकडूनही आंदोलन, उपोषण केले जात आहे; मात्र आता कामगार टंचाईमुळे महानिर्मिती कंपनीने नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Electricity
पाली : मोटारसायकलची म्हशीला धडक लागून दोन तरुणांचा मृत्यू

महाजनकोमध्ये थेट भरती प्रक्रियेअंतर्गत अ पासून ड श्रेणीपर्यंत एकूण मंजूर पदांची संख्या ८ हजार २०९ इतकी आहे. ५ हजार ४८१ पदांवर नियुक्त्या झाल्या आहेत. २ हजार ६२० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी ११९ आणि विशेष मागास प्रवर्गासाठी ३५६ पदांचा समावेश आहे. सामान्य वर्गासाठी १ हजार २२६ पदे भरली जाणार आहेत.

एक नजर...

  • एकूण मंजूर पदांची संख्या : ८,२०९

  • पदांवर नियुक्त्या झाल्या : ५, ४८१

  • सामान्य वर्गासाठी पदे भरणार : १, २२६

  • प्रकल्पग्रस्त तरुण प्रतीक्षा यादीत : १,३००

महानिर्मिती कंपनीत नोकरभरतीसाठी १३०० हून अधिक प्रकल्पग्रस्त तरुण प्रतीक्षा यादीत आहेत. महाजनकोमध्ये नोकरभरती राबवली गेली तर प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. सरकारमान्य खासगी कंपनीमार्फत महाजनको कंपनी नोकरभरतीची प्रक्रिया राबवते. कंपनीमार्फत होणाऱ्या नोकरभरतीतील घोळ पुढे आल्यामुळे महानिर्मिती या वेळी कशा पद्धतीने नोकरभरती करणार, याची उत्सुकता आहे.

- अभिजित सुतार, पोफळी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.