प्रशासनाच्या तंबीनंतर रत्नागिरीतील खासगी रुग्णालये वठणीवर

महात्मा फुले जीवनदायी योजना, जिल्ह्यात आठ दिवसांत ४,९३८ जणांना मिळाला लाभ
प्रशासनाच्या तंबीनंतर रत्नागिरीतील खासगी रुग्णालये वठणीवर
Updated on

रत्नागिरी : कोरोना महामारीच्या (covid-19) कठीण परिस्थितीत महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजनेचा लाभ देण्यास जिल्ह्यात टाळाटाळ होत होती. ((mahatma fule jivandayi policy)) मात्र, अशा हॉस्पिटलना प्रशासनाने सज्जड दम भरल्याने जिल्ह्यातील १६ हॉस्पिटलमध्ये योजनेची प्रभावी ((16 hospitals form ratngiri) अंमलबजावणी सुरू झाली. गेल्या आठ दिवसांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात चार हजार ९३८ जणांना योजनेचा लाभ दिला आहे. यात कोरोनाबाधित असलेले ५८१ जण, तर इतर चार हजार ४०७ जणांचा समावेश आहे. (ratnagiri district) शिधापत्रिका असलेल्या सर्वांना १०० टक्के योजनेचा लाभ देण्याचे आदेश आहेत. दर तीन महिन्यांनी प्रशासन याचा आढावा घेणार असल्याने सर्वसामान्यांना ही योजना जीवनवर्धिनी ठरत आहे.

कोविड काळात जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेचा लाभ दिला जात नसल्याच्या अनेक तक्रारी होत होत्या. दोन वर्षे या महामारीमध्ये पिचले गेलेल्या सर्वसामान्यांना शासनाच्या या योजना आरोग्य समस्येत तारणाऱ्या आहेत; मात्र जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटल योजनेचा लाभ देण्यास चालढकल करीत होते. तक्रारीवर जिल्हा प्रशासनाने बैठक लावली. या बैठकीमध्ये योजनेचा लाभ न देणाऱ्या जिल्ह्यातील सात हॉस्पिटलना नोटिसा बाजाण्यात आल्या होत्या. या रुग्णालयांना योजनची १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी राज्य हमी सोसायटीने तीन महिन्यांची ताकीद दिली. दर महिन्याला जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.

प्रशासनाच्या तंबीनंतर रत्नागिरीतील खासगी रुग्णालये वठणीवर
पर्यटकांनो! यंदा ऑनलाईन अनुभवा आंबोलीचं पाऊस पर्यटन

महात्मा फुले जीवनादायी आरोग्य योजनेपासून कोरोना रुग्ण वंचित असल्याची बाब प्रशासनासमामोर आली. त्यानंतर जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी जिल्हा शासकीय रुग्णालयाने जिल्ह्यातील सात रुणालयांना ठोस अंमलबजावणी करण्याची ताकीद केली. पूर्णपणे अंमलबजावणी करणाऱ्या तीन रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या. नोटिस देऊन प्रशासनाने रुग्णालयांना इशारा दिला. याची अंमलबजावणी न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य हमी सोसायटीने दिला. दर महिन्याला न चुकता या सातही रुग्णालयांचा अंमलबजावणीचा अहवाल मागविण्यात आला. या रुग्णालयांचे ८० टक्के बेड या योजनसेसाठी आरक्षित ठेवण्यास सांगितले. महात्मा ज्येतिबा फुले जीवनदायी योजनेचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना कोरोना काळातही मिळाला पाहिजे. त्याची १०० टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे, असे स्पष्ट केले.

"केशरी व पिवळी शिधापत्रिका, अन्नपूर्ण, अंत्योदय आशा कार्डधारकांना १०० टक्के योजनेचा लाभ देण्याचा निकष आहे. पांढऱ्या कार्डधारकांना यापूर्वी त्याचा लाभ मिळत नव्हता. मात्र, कोरोना काळात त्यांनाही लाभ देण्यात येत आहे. लाभ देण्याविषयी अनेक हॉस्पिटलबाबत तक्रारी होत्या. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीनंतर अंमलबजावणी सुरू झाली आहे. कार्ड असलेल्या प्रत्येकाला योजनेचा लाभ दिला जात आहे."

- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक

प्रशासनाच्या तंबीनंतर रत्नागिरीतील खासगी रुग्णालये वठणीवर
महाराष्ट्रात लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार घरबसल्या

एक नजर

  • जिल्ह्यात १६ हॉस्पिटलचा समावेश

  • चार हजार ९३८ जणांना मिळाला लाभ

  • कोरोनाबाधित ५८१ जणांचा समावेश

  • इतर चार हजार ४०७ रुग्णांना लाभ

  • प्रत्येक कुटुंबाला वर्षाला एक लाख ५० हजार लाभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.