महामार्ग चौपदरीकरणासाठी तीव्र आंदोलन करणार; महाविकास आघाडीच्या नेत्यांचा इशारा

महाविकास आघाडी २७ जानेवारीला रस्ता रोखणार
mumbai goa highway
mumbai goa highwaysakal
Updated on

चिपळूण : ‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे(mumbai-goa highway ) काम रखडले आहे. कुर्मगतीने सुरू असलेल्या चौपदरीकरणास गती(Four-laning of Mumbai-Goa highway) मिळण्यासाठी वारंवार निवेदने दिली, त्यावर चर्चा आणि बैठकाही झाल्या; मात्र केंद्र सरकार याकडे लक्ष देत नसल्याने जनतेची सहनशीलता संपली आहे. याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यात २७ जानेवारीला तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. आंदोलनाची दिशा २२ जानेवारीला बैठक घेऊन ठरवली जाईल,’ अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी(mahavikas aghadi) मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

mumbai goa highway
मंडणगड नगरपंचायत; यंत्रातील आकडे उलगडणार 44 उमेदवारांचे भविष्य

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम, जयंद्रथ खताते, मिलिंद कापडी, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव हजर होते. आमदार जाधव म्हणाले, ‘‘राज्यात इतर महामार्ग पूर्ण होत असताना कोकणातील मार्ग का रखडले यामागचे कारण जनतेला कळत नाही. महामार्ग संदर्भात आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून व्यथा मांडत असतो. राज्याच्या प्रत्येक अधिवेशनात आम्ही सर्वांचे लक्ष वेधत असतो; मात्र ११ वर्षे उलटली तरीही अजून महामार्ग पूर्णत्वास जात नाही, हे दुर्दैव आहे.’’

mumbai goa highway
ओव्हरटेक करणे भोवले; अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील काही टप्प्यातील कामे बंद आहेत. ठेकेदार कंपन्या बदलण्याच्या मागणीकडे लक्ष दिले जात नाही. चिपळूण टप्प्यात तर दोन कंपन्या आल्या. आता दुसरीही गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. ठेकेदार कंपन्या काम करत नसतानाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावरील पुलांचे भूमिपूजन एकाचवेळी झाले. त्या वेळी भूसंपादनासह कोणतीच प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती.

लोकसभा निवडणूक नुकतीच झाली होती. रस्ता चौपदरीकरणही सुरू झाले होते; मात्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर रस्ते कामाची गती मंदावत गेली. सध्या तर जिल्ह्यात काम बंद असल्यासारखे आहे. या संदर्भात खासदार राऊत यांच्या सूचनेनुसार आम्ही आघाडीच्या सर्व नेतेमंडळींनी चर्चा करून आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. २२ ला राऊत यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.

mumbai goa highway
ओव्हरटेक करणे भोवले; अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्ग रखडला

  1. जनतेची सहनशीलता संपली

  2. आंदोलनाची दिशा ठरणार २२ ला

  3. कंपन्या गाशा गुंडाळून जातात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.