मालवण : भरपावसात नारळी पौर्णिमेचा उत्साह

मालवण जेटी गजबजली : सागरास श्रीफळ अर्पण
kokan
kokansakal
Updated on

मालवण : वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसातही व्यापारी, मच्छीमार व समस्त मालवणवासीयांनी सागराला श्रीफळ अर्पण आणि उत्साह कायम ठेवत नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला. भर पावसातही नारळ लढविण्याच्या स्पर्धांमध्ये महिला व पुरुषांनी कमालीचा उत्साह दाखवत आनंद लुटला.

या उत्सवास केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राजापूरच्या माजी आमदार हुस्नबानू खलीपे यांनी उपस्थिती दर्शवली.शिवकालीन परंपरा लाभलेला येथील ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यावर आज साजरा झाला. आज ३ वाजता सर्व व्यापारी बांधव बाजारपेठेतील हनुमान मंदिरात एकत्र जमून त्यानंतर वाजतगाजत मिरवणुकीने सर्व व्यापारी बांधव, नागरिक मालवण बंदर जेटी येथे दाखल झाले.

व्यापारी बांधवांच्या वतीने अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते मानाच्या श्रीफळाचे पूजन करण्यात येऊन किल्ले सिंधुदुर्ग वरून सागरास श्रीफळ अर्पण करण्यात आल्यावर व्यापारी बांधवांच्या वतीने मुसळधार पावसातच सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, नाना पारकर, नितीन तायशेटे, बाळू अंधारी, अरविंद मोंडकर, हरी खोबरेकर आदी उपस्थित होते.

यावर्षी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे रिक्षा व्यावसायिकांच्या सहकार्याने भरड नाका ते बंदर जेटी अशी सुमारे ८० रिक्षांचा समावेश असलेली रिक्षा रॅली काढून रिक्षा व्यावसायिकांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यात रिक्षा आकर्षक पद्धतीने सजविण्यात आल्या होत्या. या रॅलीचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विजय यादव व रिक्षा संघटना अध्यक्ष पपू कद्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले. बंदर जेटी येथे रिक्षा व्यवसायिकांच्या वतीने पपू कद्रेकर यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहराध्यक्ष मंगेश जावकर, शेखर गाड, संतोष लुडबे, सुधीर धुरी, मेघा सावंत, अन्वेषा आचरेकर, पूजा वेरलकर, श्वेता सावंत, आदी उपस्थित होते.

कबड्डी स्पर्धा पावसामुळे रद्द

आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून मालवणात पावसाने आणि वाऱ्याने जोरदार हजेरी लावत पुढील दोन-तीन तास आपला जोर कायम ठेवला. मात्र, त्यानंतर बंदर जेटीवर हळूहळू गर्दी झाली. मध्ये मध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने नारळ लढविण्याच्या पारंपरीक खेळाला जोर आला. सागराला श्रीफळ अर्पण करण्यासही नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. पावसामुळे शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळ आयोजित महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा स्थगित करण्यात आली. कबड्डी व आट्यापाट्या स्पर्धाही रद्द करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.