अखेर माथेरान मिनी ट्रेनची सफर सुरू; पर्यटकांमध्ये उत्साह कायम

अखेर माथेरान मिनी ट्रेनची सफर सुरू
अखेर माथेरान मिनी ट्रेनची सफर सुरू
Updated on

माथेरान : कोव्हिड काळात माथेरानसह मिनी ट्रेन बंद झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी (ता. 4) मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्याने मिनी ट्रेन माथेरानमध्ये तब्बल चार तासाने दाखल झाली. पर्यटकांचा हिरमोड झाला असला, तरी मिनी ट्रेनच्या प्रवासासाठी उत्साह मात्र कायम होता. 

मिनी ट्रेनची प्रतीक्षा आज संपल्याने पर्यटकांनी सफरीचा आनंद घेण्यासाठी अमन लॉज स्थानक गाठले होते. सुरुवातील सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी नेरळहून फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसह मिनी ट्रेन माथेरानकडे रवाना झाली. 8 वाजता ही ट्रेन जुम्मापट्टी स्थानकावर येताच तांत्रिक बिघाड झाला.

ही ट्रेन माथेरानमध्ये 9 ते 9.15च्या दरम्यान येणे अपेक्षित असताना तब्बल चार तास उशिराने म्हणजे 1 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान माथेरान रेल्वेस्थानकात दाखल झाली. त्यामुळे सकाळच्या फेरीमध्ये जे पर्यटक अमन लॉज स्थानकात जमा होते, त्यांचा पुरता हिरमोड झाला. 

असे असतानाही काही पर्यटकांचा उत्साह मात्र वाढत होता. मिनी ट्रेनमध्ये बसण्याहेतू चार तास वाट पाहिली आणि दुपारी मिनी ट्रेन येताच त्या ट्रेनमध्ये बसून सफरीचा पुरेपूर आनंद घेतला. दोन फेऱ्या माथेरान स्थानक आणि दोन फेऱ्या अमन लॉज या एकूण चार फेऱ्यांमध्ये 79 प्रवाशांनी प्रवास केला. मिनी ट्रेनच्या सुरू होण्यामागे येथील स्थानिकांनीही आनंद व्यक्त केला आहे. 

(संपादन : उमा शिंदे)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.