Medmassa Spider : कोळ्यांच्या यादीत नव्या कुळाची भर; पश्चिम घाटात लागला दोन नव्या प्रजातींचा शोध

देशातील कोळ्यांच्या यादीत आता आणखी एका कुळाची भर पडली आहे.
Medmassa Spider Species
Medmassa Spider Speciesesakal
Updated on
Summary

नव्याने नोंद केलेल्या दोन्ही प्रजाती वेगाने धावणाऱ्या आणि निशाचर आहेत. हे शिकारी कोळी सामान्यतः झाडांच्या खोडांवर तसेच खडकांवरही आढळतात.

कुडाळ : देशातील कोळ्यांच्या यादीत आता आणखी एका कुळाची भर पडली आहे. ‘मेडमास्सा’, असे या कुळाचे नाव आहे. त्याबरोबरच ‘मेडमास्सा सॅगॅक्स’ आणि ‘मेडमास्सा पोस्टिका’ अशा दोन नव्या प्रजातींचा (Medmassa Spider Species) शोध लावण्यात आला आहे. ४ एप्रिलला हा संशोधन अहवाल आंतरराष्ट्रीय जर्नल झूटॅक्सामधून प्रसिद्ध करण्यात आला, अशी माहिती संशोधक गौतम कदम, ऋषिकेश त्रिपाठी आणि प्रदिप संकरन यांनी दिली.

Medmassa Spider Species
चुकीच्या आहार पद्धतीमुळं मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांची संख्या वाढतेय; 'आरोग्य'च्या सर्वेक्षणातून माहिती समोर..

‘मेडमास्सा’ हे कुळ १८८७ ला पहिल्यांदा नोंदविण्यात आले होते. कोरिनिडे या परिवारातील मेडमास्सा कुळाची यापूर्वी नोंद नव्हती. भारतातून (India) प्रथमच मेडमास्सा कुळातील कोळ्यांची प्रजात नोंदविली गेली असून भारतात आढळणाऱ्या एकूण कोरिनिडे कोळ्यांच्या कुळाची संख्या आता आठवर गेली आहे.

Medmassa Spider Species
Oral Cancer Symptoms : कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे? Cancer नक्की कशामुळं होतो? जाणून घ्या..

नव्याने नोंद केलेल्या दोन्ही प्रजाती वेगाने धावणाऱ्या आणि निशाचर आहेत. हे शिकारी कोळी सामान्यतः झाडांच्या खोडांवर तसेच खडकांवरही आढळतात. त्यांचा निवारा हा निसर्गाशी अनुकूल साधणारा असतो, जेणेकरून भक्ष्य सहज मिळेल तसेच शिकार होण्यापासून वाचेल. त्यांचा निवारा छदमवेष प्रकारचा असल्याने त्यांना शोधणे फार कठीण असते. पण, रात्रीच्या वेळेस ते निवाऱ्याच्या आसपास शिकारीसाठी निघतात. त्यावेळी ते नजरेस पडू शकतात.

या कुळातील नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजाती पश्चिम घाटातून नोंदविण्यात आल्या असून केरळमधील मुंडकायाम वरून ‘मेदामास्सा सॅगॅक्स’ आणि तमिळनाडूतील कन्याकुमारीमधून ‘मेदामास्सा पोस्टिका’ ही प्रजात नोंदविली गेली आहे. भारतातील संशोधक गौतम कदम, ऋषिकेश त्रिपाठी आणि प्रदिप संकरन यांनी हे संशोधन केले आहे. संशोधन करताना या कुळातील इतर प्रजातींचे नमुनेही गोळा केले होते. यातील काही नमुन्यांविषयी आयनॅचरलिस्ट (iNaturalist) सारख्या काही संकेतस्थळांवर प्रकाशित करण्यात आले. दोन नव्या प्रजातींचा शोध आणि इतर निष्कर्ष पाहता या कुळामध्ये आढळणारी विविधता अधिक असण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तविली असून अधिक संशोधन आणि सर्वे होण्याची गरज अधोरेखीत केली आहे.

Medmassa Spider Species
जंगल भटकंतीचा आनंद अन् थरारही..; भेकराचं भुंकणं, बिबट्याची साद, वानरांचं खेकसणं आणि बरंच काही..

प्रजाती नष्ट होण्याची भीती

भारतात कोळ्यावर सखोल संशोधन आणि संवर्धन होण्याची फार गरज आहे. कोळ्यांच्या अनेक प्रजाती त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी एकरूप होऊन निसर्गात छदमवेष पद्धतीने राहतात आणि ते बहुतेक वेळा त्याच ठिकाणच्या पर्यावरणाशी अवलंबून असतात. अनेक प्रजाती या प्रदेशनिष्ट आहेत. अशा परजातींची नोंद करणे फार गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या, खाणकाम, रस्ते, विदेशी झाडे आणि वाढणारी शेती यांमुळे अशा प्रजातींना नष्ट होण्याचा फार धोका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.