उच्चशिक्षणासाठी वाढते स्थलांतर ; घटती विद्यार्थी संख्या गंभीर बाब

migration of people nad student increased for job and education in mandangad ratnagiri
migration of people nad student increased for job and education in mandangad ratnagiri
Updated on

मंडणगड (रत्नागिरी) : तालुक्‍यात उच्च व तंत्रशिक्षणाच्या अत्यल्प संधींच्या समस्येवर गेल्या दशकात उत्तर सापडले असले तरी गुणवत्तापूर्ण शिक्षण व स्थानिकांकडून प्राप्त संधींचा वापर न करणे ही समस्या गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने पुढे आली आहे. तालुक्‍यात उच्च व तंत्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध हव्यात, यासाठी शासकीय व खासगी शिक्षण संस्थांना गेल्या दशकात तालुक्‍यात चांगले यश मिळाले. तालुक्‍यात सहा कनिष्ठ महाविद्यालये, तीन वरिष्ठे महाविद्यालये, एक कृषी शाळा, एक शासकीय तंत्रनिकेतन, एक अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. मात्र, विविध शिक्षणक्रमांना विद्यार्थीसंख्येची समस्या सातत्याने भेडसावत आहे. 

स्थानिक विद्यार्थ्यांची सोय व्हावी, या उद्देशाने निर्माण झालेल्या संधीचा स्थानिकांनी उपयोग करून घेणे गरजेचे आहे. तालुक्‍यातील शिक्षणसंस्था स्थानिक विद्यार्थ्यांचा आपल्या शिक्षणक्रमात सहभाग वाढावा व त्यांनी येथे उपलब्ध संधीचा उपयोग करावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. पण दहावी व बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी अथवा रोजगारासाठी महानगरांमध्ये स्थलांतरित होण्याच्या स्थानिकांच्या मानसिकतेमुळे येथील शिक्षणसंस्थाना आपले शिक्षणक्रम सूरू ठेवण्यासाठी बाहेरील तालुक्‍यातील विद्यार्थ्यांकडे धाव 
घ्यावी लागते हे वास्तव आहे.

सर्वच शिक्षणसंस्थाना विद्यार्थीसंख्येची समस्या भेडसावत आहे. कोव्हिडमुळे ही परिस्थिती आणखीनच वाईट झाली. तालुक्‍यात दरवर्षी दहावीचे सुमारे ९०० विद्यार्थी तर बारावीचे सुमारे ५०० विद्यार्थी उत्तीर्ण होतात. रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतरामुळे दरवर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसंख्येतही गेल्या पाच वर्षांपासून दहा ते वीस टक्‍क्‍यांपर्यंत सातत्याने घट 
सुरू आहे. 

जिल्हा परिषद शाळाही बंद होण्याचे प्रमाण वाढत आहे. २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सुमारे ७०० विद्यार्थ्यांनीच पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. भविष्यात वरच्या वर्गातील विद्यार्थी प्रवेशाची समस्या आणखीनच गंभीर होणार आहे. गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षण ही बदलत्या काळातील समस्या आहे. तिच्यावरही अद्याप उत्तरे शोधायची आहेत.

अभ्यासक्रम पडतात कमी

स्थलांतराच्या समस्येवर उपाय शोधणे गरजेचे आहे, तरच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ स्तरावरील शिक्षणक्रमांना विद्यार्थीसंख्येची समस्या शिल्लक राहणार नाही. रोजगाराची शाश्वती देण्यास येथील अभ्यासक्रम कमी पडत असल्यानेच मोठे स्थलांतर होत आहे. सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण संस्थांनीही रोजगारक्षम शिक्षणक्रम राबविणे गरजेचे झाले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.