महाराणा प्रताप कलादालनावर लाखो रूपये खर्च

नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर या कामांची चौकशी करण्यात येईल
महाराणा प्रताप कलादालनावर लाखो रूपये खर्च
महाराणा प्रताप कलादालनावर लाखो रूपये खर्च sakal
Updated on

वैभववाडी : महाराणा प्रताप कलादालनावर लाखो रूपये खर्च होवुन त्याचे काम निकृष्ट झाले आहे. नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर या कामांची चौकशी करण्यात येईल, असे मत व्यक्त करतानाचा अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यत महाविकास आघाडीकरीता दरवाजे खुले असल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिले.नगरपंचायत निवडणुक अनुषंगाने पालकमंत्री सामंत यांनी जिल्हयातील दोडामार्ग, कुडाळ, देवगड तालुक्यांच्या दौऱ्यानंतर आज सायंकाळी वैभववाडी येथील शिवसेना संपर्क कार्यालयात कार्यकर्त्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत शिवसेना नेते संदेश पारकर, संजय पडते, नंदु शिंदे, मंगेश लोके, रविंद्र रावराणे, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.

महाराणा प्रताप कलादालनावर लाखो रूपये खर्च
आपापसात लढण्यापेक्षा एकत्र लढू ; उदय सामंत

पालकमंत्री सामंत म्हणाले, "ज्यांच्याकडे नगरपंचायतीचा कारभार होता त्यांनी दिलेला निधी खर्च केला नाही. त्यामुळे अपेक्षित विकास देखील झाला नाही. वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रात उभारण्यात आलेल्या महापुरूष महाराणा प्रताप कलादालनाकरीता शासनाने निधी दिला; परंतु ते काम निकृष्ट झाले. पावसाळ्यात या कलादालनाच्या छप्परावर प्लास्टीक कापड घालावे लागले. त्यामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर या कामांची चौकशी केली जाईल. शहराच्या सर्वागीण विकासांसाठी प्रयत्न केले जातील. पाण्याच्या योजनेच्या मंजुरीसाठी निवडणुक जाहीर होण्यापुर्वीच प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शहराचा सर्वागीण विकास व्हावा हाच शिवसेनेचा अजेंडा आहे."

महाराणा प्रताप कलादालनावर लाखो रूपये खर्च
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

वैभववाडीत महाविकास का होवु शकली नाही, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "शिवसेना महाविकास आघाडीकरीताच आग्रही आहे. त्यामुळे आजदेखील आघाडी व्हावी अशी आमची भुमिका आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न देखील आहे. १३ डिसेंबरला अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यत महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत. तशा स्वरूपाची चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरू आहे."देवगडात धक्कादायक निकाल लागेल,कसई दोडामार्ग, कुडाळ आणि वाभवे वैभववाडीत शिवसेना महाविकास आघाडीकरीता पोषक वातावरण असुन या तीनही नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचीच सत्ता येईल. त्याचबरोबर देवगडमध्ये देखील धक्कादायक निकाल लागेल, असे मत पालकमंत्र्यानी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.