मालवण येथे भारतीय नौदलामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये हा पुतळा कोसळला.
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे त्यांचा १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, तसेच या परिसरात भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिवसृष्टी’ उभारावी, अशी विनंती शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.