सिंधुदुर्गनगरी- राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे येथे पदाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदामंत्री पाटील यांचे जिल्ह्यात सिंधुदुर्गनगरी येथे आगमन होताच पुष्पगुच्छ, फटाक्यांच्या आणि ढोल ताशांच्या आतषबाजीत जंगी स्वागत केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जयंत पाटील यांनी पुष्पहार घातला. येथे त्यांचे राष्ट्रवादी महिला संघटनेच्यावतीने, तसेच कुडाळ राष्ट्रवादी संघटनेच्यावतीने स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कुडाळ तालुकाध्यक्ष भास्कर परब, बाळ कनयाळ कर, सुनिल भोगटे, हेमंत कांदे आदीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात राष्ट्रवादी अधिक भक्कम करण्याबाबत बैठकांमध्ये प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेवून जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक जोमाने काम करण्याच्या दृष्टीने प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करा. पक्ष आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली.
यावेळी बैठकीपूर्वी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदींनी जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
आजच्या सिंधुदुर्गनगरीतील बैठकीसाठी जिल्हाभरातून राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रांतिक सदस्य उदय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी.सावंत, विजय कदम, अशोक पवार, रंजना निर्मळ, भाई भाईप, सत्यजित धारणकर, गुरुदास कामत, सुनील भोगटे, बाळा सातार्डेकर, विल्यम डिसोजा, अगस्ती फर्नांडिस, आयन रेडीज, आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. जयंत पाटील यांच्या आगमनाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. पक्ष संघटनेच्या दृष्टीने जयंत पाटील यांचा आजचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
समन्वय बैठकीची मागणी
यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सत्तेच्या प्रवाहात सामील करून घेण्यात यावे, पालकमंत्री शिवसेनेचे असले तरी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडीचे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधनेच्या दृष्टीने तालुकास्तरावर विकासकामांना आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जावे व राष्ट्रवादी कॉंग्रेसची समन्वय बैठक घेतली जावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष भास्कर परब यांनी केली.
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.