'जबाबदारी स्विकारून राणेंनी स्वतः जिल्ह्याबाहेर जावे'

आमदार निलेश राणे यांनी खुशाल चॅलेंज द्यावे, त्यांचा यात हात नसेल तर त्यांनी घाबरु नये
politics
politics
Updated on
Summary

आमदार निलेश राणे यांनी खुशाल चॅलेंज द्यावे, त्यांचा यात हात नसेल तर त्यांनी घाबरु नये

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sidhudurg district) प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर हल्ले करणाऱ्या लोकांना दूर ठेवून जनतेने निर्भयपणे मतदान करावे. जिल्ह्यात बाहेरून आलेल्यांना शोधून पोलिसांनी (Police) त्यांना जिल्ह्याबाहेर पाठवावे तर मतदान सुरळीत होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतः जिल्ह्याबाहेर जावे, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री आमदार दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी केले.

(कै.) अंकुश राणे खून प्रकरणी फाईल रिओपन करण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री असताना दिले होते; मात्र ती अद्यापही का झाली नाही हे पाहावे लागेल. हे सर्व आकसापोटी होत नाही, त्यामुळेच आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी खुशाल चॅलेंज द्यावे, त्यांचा यात हात नसेल तर त्यांनी घाबरु नये, असा टोलाही केसरकर यांनी लगावला.

politics
बेळगावात आणखी एका पुतळ्याची विटंबना, 27 जणांना अटक

आमदार केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे (District Bank Election 2021) मतदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर भीषण हल्लाचा निषेधार्थ केला. यावेळी महाविकासआघाडी नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डॉन्टस, काँग्रेसचे नेते विकास सावंत, विलास गावडे, विद्याप्रसाद बांदेकर, पुंडलिक दळवी, सुशांत नाईक, देवेंद्र टेमकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार केसरकर म्हणाले, "जिल्ह्यात निवडणुकीच्या तोंडावर हल्ले करुन मतदारांना घाबरायचे, त्याचा फायदा निवडणुकीत घ्यायच्या ही परंपरा कायम राहिली आहे; मात्र २०१४ च्या निवडणुकीत जनतेने लोकशाही जिवंत ठेवत हुकूमशाहीला हद्दपार केले होते. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील शस्त्र मोठे असते तर अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला असता. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात सद्यस्थितीत बाहेरून आलेल्या लोकांचा शोध घ्यावा व त्यांना जिल्ह्याबाहेर काढावे." (Political News)

केसरकर पुढे म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि जिल्ह्यातील चारही नगरपंचायत निवडणुका निर्भयपणे होण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी. जिल्हा बँकेतील मतदार हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांना संरक्षण देणे शक्य नाही म्हणून पोलिसांनी मतदारांची यादी घेतली आहे. पोलिस याकडे लक्ष ठेवून निर्भयपणे मतदान करण्यास पुढाकार घेतील. मतदारांनी आमिषाला बळी पडू नये. (कै.) अंकुश राणे यांचा खून झाला, त्यावेळी खासदार संजय राऊत व वैभव नाईक यांचे नाव या लोकांनी घेतले होते. फक्त पोलिस यंत्रणेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप केले जातात. पोलिसांनी अशा बालीश आरोपांकडे दुर्लक्ष करून कटकारस्थान करणाऱ्यांवर कारवाई करावी. केंद्रीय मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत. त्यांचे समर्थक मतदारांवर दबाव आणण्यात माहीर आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जावे. जिल्ह्यातील शांतता कायम ठेवण्याची खबरदारी घ्यावी.

politics
पुणे - वैशाली हॉटेलचे मालक जगन्नाथ शेट्टी यांचे निधन

आपण पालकमंत्री असताना नगर परिषद, नगर पंचायतींसाठी कोट्यावधी रुपये दिले ते प्रकल्प कार्यरत झालेत ते आपणच केले असल्याचे सध्या विरोधक भासवत आहेत; मात्र मागील पंचवीस वर्षात निधी मिळाला नाही. एवढा निधी पालकमंत्री असताना दिला. त्यामुळे विरोधकांनी माणुसकी दाखविली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना राजन तेली यांनी बोलेरोसाठी राजकीय कर्ज दिले. त्या गाड्यांच्या चौकशीची मागणी सिंधुदुर्ग पोलिसांकडे झाली होती. राजकीय कारणासाठी बँक वापरली गेल्यास शेतकऱ्यांचे पैसा सुरक्षित राहणार नाही."

केसरकर पुढे म्हणाले, "अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांची भाजपा आता शिल्लक राहिली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा ही राणे समर्थकांची भाजपा असल्याने जुने भाजपा कार्यकर्ते अविचारी लोकांच्या तत्वाला साथ देणार नाही. सतिश सावंत हे सुद्धा तत्त्वासाठी बाहेर पडले. त्यांनी राणेंना जिल्हा बँकेत चुकीच्या गोष्टी करण्यास नकार दिला.

politics
'मी आयुष्यात कुणालाही दुखावलं नाही'; CM बोम्मईंचे स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.