आधुनिक काळातील सावित्री, स्वतःची किडनी दान करून वाचवले पतीचे प्राण

Raigad: पतीचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने आपली किडनी दान करून पतीला नवीन आयुष्य दिले
आधुनिक काळातील सावित्री, स्वतःची किडनी दान करून वाचवले पतीचे प्राण
Updated on

Pali: पतीला कोरोनाने ग्रासले आणि या कोरोनामुळे पतीच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या, त्यानंतर पतीचे आयुष्य हे डायलिसिस वर सुरू झाले. किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता, मग पतीचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने आपली किडनी दान करून पतीला नवीन आयुष्य दिले.

आधुनिक काळातील सावित्री, स्वतःची किडनी दान करून वाचवले पतीचे प्राण
Raigad Rain Update : अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक पहाटेपासून ठप्प

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील मोहनलाल सोनी विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी मंजिरी महेश मुणगेकर-भाटकर यांनी मागील वर्षी आपल्या पतीला किडनी दान केली. शनिवारी (ता. 3) जागतिक अवयव दानदिनानिमित्त त्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.raigad

आधुनिक काळातील सावित्री, स्वतःची किडनी दान करून वाचवले पतीचे प्राण
Raigad Schools Closed: राज्याला पावसाचा दणका! पुण्यानंतर 'या' जिल्ह्यातील शाळांनाही जाहीर झाली सुट्टी

यावेळी मंजिरी यांनी आपले अनुभव व अवयव दानाचे महत्व सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कासारे व शिक्षिका संध्या कासारे यांनी अवयव दानाचा संकल्प आठ वर्षांपूर्वी केला आहे.

या दिवसाचे औचित्य साधून त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. जनता शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा शितल तोडणकर यांच्या हस्ते व संचालक रमेश घरत व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मंजिरी महेश मुणगेकर-भाटकर व कासारे दांपत्याचा गौरव करण्यात आला.

आधुनिक काळातील सावित्री, स्वतःची किडनी दान करून वाचवले पतीचे प्राण
Raigad Constituency Lok Sabha Election Result: अजित पवारांचा एकमेव सुभेदार रायगडमध्ये विजयी! अस्तित्वाच्या लढाईत गितेंचा पराभव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.