प्रवाशांनो लक्ष द्या; कोकण रेल्वेमार्गावर आजपासून पावसाळी वेळापत्रक!
Kokan Railway:sakal

Kokan Railway: प्रवाशांनो लक्ष द्या; कोकण रेल्वेमार्गावर आजपासून पावसाळी वेळापत्रक!

गाड्यांच्या वेळात बदल; विशिष्ट ठिकाणी वेगावर नियंत्रण
Published on

Ratnagiri News: कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या गाड्यांसाठी उद्यापासून (ता. १०) पावसाळी वेळापत्रक लागू होत आहे. दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका असलेल्या भागातून गाड्यांच्या वेगावर नियंत्रण येत असल्यामुळे कोकण रेल्वेकडून दरवर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाते.

या बदलामुळे प्रवाशांनी आपण प्रवास करत असलेल्या गाडीची वेळ प्रवासापूर्वी तपासून घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

 प्रवाशांनो लक्ष द्या; कोकण रेल्वेमार्गावर आजपासून पावसाळी वेळापत्रक!
Kokan Politics: कोकणावरील ठाकरेंची पकड होतेय सैल, जाणून घ्या काय आहे कारण!

पावसाळ्यात कोकण रेल्वेमार्गावर दरड कोसळणे, मार्गावर चिखलमाती येणे, पावसाचे पाणी येऊन मार्ग विस्कळीत होणे अशा बाबी लक्षात घेऊन कोकण रेल्वेमार्गावर दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी पावसाळी वेळापत्रक आखले जाते. त्यानुसार काही गाड्यांच्या वेळा बदलाव्या लागतात तर काही गाड्यांची फ्रिक्वेन्सी बदलावी लागते.

या कारणामुळेच कोकण रेल्वेमार्गावर धावणारी मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव वंदेभारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस चालवल्या जातात. इतरवेळी वंदे भारत एक्स्प्रेस सहा दिवस तर तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून पाच दिवस चालवली जाते तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान धावणारी एक्स्प्रेस आठवड्यातून दोनच दिवस चालवण्यात येते.

 प्रवाशांनो लक्ष द्या; कोकण रेल्वेमार्गावर आजपासून पावसाळी वेळापत्रक!
House Boat In Kokan : कोकणात घ्या केरळाचा फिल, वॉटर स्पोर्ट्सच्या रांगेत आता हाऊसबोट दाखल

याचबरोबर मंगळुरू-मुंबई एक्स्प्रेस, मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस तसेच मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस या अप् दिशेने धावणाऱ्या गाड्यांच्या रत्नागिरीपर्यंतच्या वेळापत्रकात मान्सून वेळापत्रकानुसार बदल होतो. उद्यापासून होत असलेले बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी पावसाळी वेळापत्रकानुसार आपल्या गाडीची अचूक वेळ तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.


मुसळधार पावसातही वेग कमी
मुसळधार पाऊस सुरू झाला की, कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा वेग कमी केला जातो. त्यामुळे अनेकवेळा गाड्या उशिराने धावतात. असे प्रसंग कमीवेळा उद्भवत असतात. तरीही पावसाच्या कालावधीमध्ये प्रवासी वाहतुकीत अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी वेळापत्रक बलण्यात येते. काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात येतात.

 प्रवाशांनो लक्ष द्या; कोकण रेल्वेमार्गावर आजपासून पावसाळी वेळापत्रक!
Kokan Politics: राज ठाकरे करणार राणेंचा प्रचार, या दिवशी घेणार कणकवलीत सभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.