चक्रीवादळाच्या प्रभाव आणि मॉन्सूनपूर्व परिस्थिती यामुळे कोकण किनारपट्टीवर लाटा उसळत आहेत.
रत्नागिरी : बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biparjoy) कोकण किनारपट्टीपासून (Konkan) सुमारे सातशे किलोमीटर खोल समुद्रात असतानाही वाऱ्याच्या वेगामुळे तयार झालेल्या लाटा वेगाने गणपतीपुळेसह अन्य किनाऱ्यांवर जाणवल्या, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
रविवारच्या (ता. ११) त्या लाटेला वेग आणि करंट होता. किनाऱ्यावरील कठडयापर्यंत लाटा येतात, पण वेगाने अचानक लाट येण्याचा पहिलाच प्रकार आहे. तेरा वर्षापूर्वी आलेल्या उधाणावेळच्या लाटांमुळे शासकीय विश्रामगृहाच्या भिंतीचे नुकसान झाले होते.
समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात होते. या वादळाच्या भोवती निर्माण होणारे वारे आणि त्याचा वेग यामधून लाटा तयार होतात. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या वाऱ्यामुळे लाटा तयार होतात आणि त्या वेगाने किनाऱ्याकडे सरकतात. वाऱ्याच्या वेगावर किनाऱ्यावरील लाटांचे स्वरुप अवलंबून असते.
बिपरजॉय चक्रीवादळाचा परीणाम गेले काही दिवस कोकण किनारपट्टी भागात जाणवत आहे. रविवारी ओहोटी सुरू होण्याच्यावेळी गणपतीपुळे किनारपट्टीवर आलेल्या दोन लाटांनी पर्यटकांसह किनाऱ्यावरील व्यापाऱ्यांमध्ये काही क्षणासाठी धडकी भरली.
याबाबत गणपतीपुळेतील डॉ. विवेक भिडे म्हणाले, येथील किनाऱ्यावर पावसाळ्यात मोठ्या लाटा येत असतात. वादळामुळे लाटेची तीव्रता वाढत गेली आणि उंचीही होती. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तानकडे सरकत असल्याचा अंदाज आहे. या वादळाचा प्रभाव पुढील ३६ तास कोकण किनारपट्टीवर जाणवेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
चक्रीवादळाच्या प्रभाव आणि मॉन्सूनपूर्व परिस्थिती यामुळे कोकण किनारपट्टीवर लाटा उसळत आहेत. समुद्राच्या पृष्ठभागावरील वाऱ्याचा वेग लाटांची उंची आणि तीव्रता ठरवतो. सध्या वादळामुळे वारे वेगाने वाहत आहेत. जोरदार वाऱ्याने गणपतीपुळेत आलेल्या लाटेचा वेग व उंची तीव्रता वाढवून गेली.
- डॉ. अनिलकुमार पावशे, प्रमुख, फिशरी हायड्रोग्राफी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.