जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे शेतीच्या कामांना पुन्हा सुरूवात झाली आहे.
वैभववाडी : गेल्या चार-पाच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने (Sindhudurg Rain Update) पुन्हा हजेरी लावली. पहाटेपासून सुरू असलेल्या सरीमध्ये दुपारनंतर वाढ झाली असून, सायंकाळी जिल्ह्याच्या सर्व भागांत जोरदार पाऊस सुरू आहे.
या पावसामुळे खोळंबलेल्या भातरोप पुनर्लागवडीला वेग आला आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्याच्या सर्व भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Meteorology Department) वर्तवला आहे. जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली.
काही भागांत हलक्या, तर काही भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत होत्या; मात्र त्याचा भातरोप पुनर्लागवडीकरीता उपयोग होत नव्हता. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेली भातरोप पुनर्लागवड थांबली होती. अनेक शेतकऱ्यांनी भातरोपे काढून ठेवलेली आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते.
काल रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. रात्री पावसाच्या चांगल्या सरी जिल्ह्याच्या सर्व भागांत बरसल्या. त्यानंतर आज पहाटेपासून देखील पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. आज दुपारपर्यंत जिल्ह्यात सरीवर सरी पडत होत्या; परंतु दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.
या पावसामुळे शेतीच्या कामांना पुन्हा सुरूवात झाली आहे. भातरोप पुनर्लागवडीला पुन्हा गतीने सुरूवात झाली आहे. काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल, अशा शक्यतेने भातरोपे काढून ठेवलेली आहेत. या रोपांचे नुकसान होण्याची शक्यता होती; परंतु आज पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.