बोटिंगची सुविधा सुरू झाल्यास तालुक्यातील ती पहिली पर्यटनासाठी सोय ठरणार आहे. कारण चांदोली धरणाच्या जवळ असलेल्या कांडवण जलाशयातच एकमेव बोटिंगची सुविधा आहे.
पुनवत : दुर्लक्षित राहिलेला व शिराळा शहरानजीक असलेल्या मोरणा मध्यम प्रकल्प (Morana Project) विस्तीर्ण जलाशय बोटिंग सुविधाच्या प्रतीक्षेत आहे. या जलाशयात बोटिंग (Boating) सुविधा सुरू झाल्यास व राज्याच्या पर्यटन विभागाने (एम.टी.डी.सी.) लक्ष घातले, तर शिराळ्याच्या गतवैभवात भर पडेल व शिराळा शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी एकमेव पर्याय ठरेल.
या प्रकल्पावर जाण्यासाठी शिराळा शहराबरोबरच चारही बाजूने रस्ते आहेत. शिराळाचे ग्रामदैवत अंबाबाई मंदिर (Ambabai Temple), मारुती मंदिर, भुईकोट किल्ला, तसेच गोरक्षनाथ मंदिराकडे येणारे मोठ्या प्रमाणातील भक्तगण व पर्यटक आपोआपच या जलाशयाकडे वळतील व पर्यटनास चालना मिळेल. शिराळा शहरापासून काही अंतरावर पाऊण टी.एस.सी.क्षमतेचे मोरणा मध्यम प्रकल्प आहे.
या धरणाच्या पाठीमागे ५ किलोमीटरपर्यंत पाणीसाठा आहे प्रतिवर्षी या धरणात चांगल्या प्रकारे पाणीसाठा असतो. पाऊसकाळ चांगला झाला तर अगदी मार्च एप्रिलपर्यंत पाणीसाठा चांगला असतो व निसर्गरम्य वातावरण असते. वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेचे पाणीही सोडता येते. त्यामुळे येथे बोटिंगची सुविधा निर्माण करण्यास चांगली संधी आहे.
येथे बोटिंगची सुविधा सुरू झाल्यास तालुक्यातील ती पहिली पर्यटनासाठी सोय ठरणार आहे. कारण चांदोली धरणाच्या जवळ असलेल्या कांडवण जलाशयातच एकमेव बोटिंगची सुविधा आहे. सध्या मोरणा धरण पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मात्र, आजअखेर दुर्लक्षितच आहे बाहेरून येणारे पर्यटक या धरणाकडे कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने फिरकतही नाहीत.
तसेच धरणाकडे जाणारे मार्गही सुस्थितीत नाहीत. धरणातील पाणीसाठा व एकंदरीत परिस्थिती पाहता येते बोटिंग क्लब सुरू होण्यास चांगली संधी आहे धरण प्रशासन किंवा शिराळा नगरपंचायत, शिराळा व सांगली पाटबंधारे विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास परिसरातील लोकांना बोटिंगद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सध्या तालुक्यात कुठेही बोटिंगची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे चांदोलीकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही पर्वणी व सुवर्णसंधी ठरणार आहे. येथे बोटिंग सुविधा उपलब्ध झाल्यास युवकांच्या हाताला काम मिळेल अनेक व्यवसाय करण्याच्या संधी लोकांना आपोआपच येथे उपलब्ध होतील.
मोरणा जलाशयात बोटिंग सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांची पावले आपोआपच इकडे वळतील व शिराळ्याच्या गतवैभवात मोठी भर पडेल. प्रकल्पाला लागूनच उंचवट्यावर जवळपास २ एकर जागा पाटबंधारेच्या ताब्यात आहे. चारही बाजूस हिरवीगार शेती आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी निवासाची सोय उपलब्ध करता येईल. राज्याच्या पर्यटन विभागाने प्रत्यक्ष पहाणी करून लक्ष घालावे.
-अभिजित नाईक, माजी नगरसेवक, शिराळा नगरपंचायत
येथे बोटिंग सुविधा उपलब्ध झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. धरणाच्या भोवतालच्या गावातील युवकांच्या हाताला काम मिळेल. अनेक व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध होतील व गावाच्या विकासात भर पडेल.
-प्रियांका सचिन पाटील, सरपंच, तडवळे, ता. शिराळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.