कोकणातील कातळशिल्पे १९९० पासून अनेक मंडळींनी उजेडात आणण्यास सुरुवात केली होती.
रत्नागिरी : कोकणातील जांभ्या दगडातील कातळशिल्प (Katal Shilp) आणि वारसा संशोधन केंद्राचे एक पाऊल पुढे पडले आहे. कातळशिल्पांच्या ठिकाणी दगडी हत्यारे मिळाल्याने येथे प्राचीन मानवाचा वावर असल्याचे जणू पुरावे आढळले आहेत. महाराष्ट्रातील पहिले वारसा संशोधन केंद्र (Research Centre) रत्नागिरीत गेले वर्षभर कार्यरत असून, त्याद्वारे संशोधनाला गती मिळाली आहे.