पाली - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गिर्यारोहक व प्रस्तारारोहक आणि सुधागड तालुक्यातील रहिवासी तसेच 'मॅकवीला द जंगलयार्ड'चे संस्थापक मॅकमोहन हुले यांनी उतुंग कामगिरी केली आहे. त्यांनी नुकतेच हिमाचल प्रदेश येथील माउंट युनाम हे 20140 फूट म्हणजेच 6111 मीटर उंच शिखर यशस्वीरित्या सर केले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.