कोकण हा शिवसेना पक्षाचा कणा, शिवसेनेने कोकणला भरभरून दिले आहे
खेड : कोकणात युवकांना शिवसेना समजावून सांगण्याची जबाबदारी युवासैनिकांनी उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार प्रताप जाधव यांनी शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्या निमित्ताने (ता. २९) रोजी खेड येथील पाटीदार भवन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. (konkan political News)
यावेळी खासदार जाधव म्हणाले, कोकणात शिवसेनेची पाळंमुळं घट्ट रोवली गेली आहेत. शिवसेना प्रमुखांना भक्कम साथ कोकणी माणसाने दिली आहे. (Shivsena Political News) कोकणातील शिवसैनिकांना महत्वाची पद संघटनेत दिली आहेत. राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार असले तरी आगामी विधानसभेपूर्वी आपल्याला असे काम करायचे आहे, की पक्षप्रमुखांना अन्य कुणाशीही आघाडी करावी लागू नये.
पुढे ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत विधानभवनावर केवळ भगवा फडकवण्यास शिवसैनिकांनी सज्ज रहावे. आगामी कालावधित होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागायचे आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा आरोप करणाऱ्या भाजपने सकाळी राष्ट्रवादी सोबत शपथ घेताना हिंदुत्वचा विचार कुठे ठेवला होता, असा सवालही त्यांनी केला आहे.
युवा सैनिकांनी सोशल मीडियावर सक्रिय राहून शिवसेनेच्या विचारावर आघात करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चोख उत्तर देणे काळाची गरज आहे. शिवसेनेतील जेष्ठ मंडळींनी तरुणासोबत संवाद करून निर्माण झालेली दरी कमी करण्याची गरज आहे, असे आवाहनही यावेळी जाधव यांनी केले. यावेळी विभागप्रमुख सुधीर मोरे , जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी जिल्हापरिषद सदस्य अरुण कदम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी खेड तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्याला शिवसेना विभाग प्रमुख सुधीर मोरे, संपर्क प्रमुख श्री. बोरकर, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुका प्रमुख विजय जाधव, शहरप्रमुख निकेतन पाटणे, जिल्हापरिषद सदस्य अरुण कदम, माजी सभापती विजय कदम, जिल्हा महिला आघाडी प्रमुख अरुणा आंब्रे, सचिन धाडवे, कुंदन सातपुते, अंकुश काते, अरविंद तोडकरी, माधवी बुटाला, राजेश बुटाला, यांच्यासह शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन राजेंद्र शेलार यांनी केले.
कोकण हा शिवसेनेचा कणा
कोकण हा शिवसेना पक्षाचा कणा आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी कोकणी बांधव आजपर्यंत ठाम उभा आहे. त्यामुळे पक्षानेही कोकणाला भरभरून दिले आहे. आज मुंबई महानगरपालिकेत महापौर, नगरसेवक तर विधानसभेत आमदार हे मोठ्या प्रमाणात कोकणचे आहेत, असे मतही खासदार जाधव यांनी व्यक्त केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.