खासदार राऊतांशी चर्चेवेळी बाहेर पडली खदखद
चिपळूण : पश्चिम महाराष्ट्राला (paschim maharashtra)वाचविण्यासाठी आम्हाला बुडविले गेले. याला प्रशासनच जबाबदार असल्याचा थेट आरोप केला. तसेच, तुम्ही आमचे मायबाप आहात. आम्ही तुमच्याकडेच रडणार, भांडणार, तुम्हालाच बोलणार; पण तुम्हीही इतका उशीर केलात. गेले २० दिवस आम्ही येथे बसलोय. काही मशिनरी येथे आली आहे, पण ती पुरेशी नाही. आमचा आता विश्वास नाही. लाल, निळी पूररेषा आमच्या डोक्यावर लादली गेली आहे. कुठे जायचे आम्ही? हजार वर्षांची बाजारपेठ आणि हे शहर सोडून जायचे तरी कुठे? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार उपोषणकर्त्यांनी खासदार विनायक राऊत (mp vinayak raut)यांच्यावर केला. अनेक दिवसांची खदकद यानिमित्ताने नागरिकांनी व्यक्त केली.
चिपळूण व परिसर पूरमुक्त करण्यासाठी वाशिष्ठी (vashishthi)व शिवनदीतील गाळ काढावा, यासाठी चिपळूण बचाव समिती(Chiplun Rescue Committee ) आणि समस्त चिपळूणवासीयांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाला खासदार राऊत(mp vinayak raut) यांनी रविवारी (ता. २६) संध्याकाळी भेट दिली. चिपळूण बचाव समिती तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते. बचाव समितीचे बापू काणे, राजेश वाजे, शहनवाज शहा, सतीश कदम आणि अरुण भोजने यांनी उपोषणाचा हेतू आणि प्रशासनाने पाठवलेले चुकीचे रिपोर्ट याबाबत स्पष्ट माहिती दिली.येथील वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. गाळ काढण्यासाठी लागेल तितका निधी दिला जाईल. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thakre)यांच्याबरोबर बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन खासदार राऊत यांनी चिपळूण बचाव समिती आणि उपोषणकर्त्यांना दिले. तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास राऊत यांनी उपोषणस्थळी दिला. परंतु, साहेब तुम्ही उशीर केला. आता आमचा कोणावर विश्वास नाही, असे उपोषणकर्त्यांनी ठणकावले.
खासदार राऊत म्हणाले, की मला येथे येण्यास उशिर झाला हे खरंच आहे. लोकसभेचे अधिवेशन सुरू होते. अनेक महत्वाचे विषय होते. गटनेता म्हणून मला उपस्थित राहणे आवश्यक होते. म्हणून येऊ शकलो नाही. परंतु मी गप्प होतो, असेही नाही. बचाव समितीच्या सर्व सदस्यांशी मी बोलत होतो. तसेच झालेल्या बैठकांमध्ये मी व्हीसीद्वारे उपस्थित होतो. परंतु तांत्रिक कारणामुळे माझा पूर्ण संपर्क होत नव्हता. पण येथील सर्व विषय महाराष्ट्र शासनापर्यंत मी पोहचवले आहेत.
कारणे सांगून पळ काढता येणार नाही ; राऊत
प्रशासन काय-काय रिपोर्टिंग करतेय, कोर्टाचे नाव सांगून कशी पळवाट काढली जाते, याकडे माझे बारीक लक्ष आहे. अशी कारणे सांगून अजिबात पळ काढता येणार नाही. त्याच्यावर मार्ग काढावाच लागेल. त्यामुळे त्यांना कुठे रोखायचे, हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. मी तुमच्या कुटुंबातला आहे. महापुरात चिपळूणची अवस्था मी पाहिली आहे. १२ दिवस मी येथे होतो. आता चिपळूणलाच नव्हे, तर कोकणाला वाचविण्याची वेळ आली आहे. १७० कोटीच नव्हे, तर लागेल तितका निधी येथील गाळ काढण्यासाठी दिला जाईल. त्यासाठी मी तुमच्या पुढे असेन, असेही राऊत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.