पाली - सौर ऊर्जेचे गाढे अभ्यासक आणि संशोधक निलेश मोने यांनी बहुपयोगी सोलर ड्रायर बनविला आहे. त्यांनी केलेल्या या संशोधनाबद्दल सोमवारी (ता. 12) भारत सरकार तर्फे पेटंट बहाल करण्यात आले आहे. या मूलभूत संशोधनाबद्दल त्यांचे जगभर कौतुक होत आहे. तसेच विविध ठिकाणी सत्कार देखील केला आहे.