Mumbai Goa Highway - मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इंदापूर मार्गावर खरवली फाट्याजवळ शुक्रवारी (ता.30) रात्री साडेआठच्या सुमारास रत्स्यावर एक मगर आली होती. या मगरीला वनविभाग व सह्याद्री वन्यजीव रक्षणात सामाजिक संस्था कोलाड (SVRSS) रेस्क्यू टीमने सुखरूप अधिवासात सोडले.
प्रसाद महाडिक हे आपल्या दुचाकीवरून माणगाव वरून कोलाडच्या दिशेने येत असताना खरवली फाट्याजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती त्यांना एक मगर दिसून आली. त्यांनी कोणतेही वेळ न घालवता लगेच सह्याद्री वन्यजीव रक्षणात सामाजिक संस्था कोलाड (SVRSS) यांना संपर्क केला.
लगेचच संस्थेतील रेस्क्यू टीमने माणगाव कडे जाण्यास सुरुवात केली पण मुसळधार पावसामुळे गाडीचे वेग मंदावले होते. जवळपास 45 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहचले. त्यानंतर माणगाव वन विभागाला संपर्क करून मगरीला सुखरूपरीत्या रेस्क्यू करण्यात आले.
मगरीची लांबी ही 3 फूट इतकी होती. माणगाव पासून जवळच असलेल्या काळ नदीमध्ये वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली मगरीला सुखरूपरीत्या सोडण्यात आले. मगरीला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागासह रेस्क्यू टीमचे सदस्य सागर दहिंबेकर, श्वेता विश्वकर्मा, सुरज दहिंबेकर अजय राजीवले व प्रणय सागवेकर यांनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.