कोकण : परशुराम घाटात दरड कोसळली, महामार्गावरील वाहतूक बंद

पाऊस सुरू झाल्यापासून घाटात किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
mumbai goa highway parshuram ghat landslide
mumbai goa highway parshuram ghat landslide
Updated on
Summary

पाऊस सुरू झाल्यापासून घाटात किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

चिपळूण - सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मातीसह दरड खाली आहे. यामुळे वाहतूकीसाठी महामार्ग बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी पोहचले आहेत. पर्यायी वाहतूक लोटे चिरणी कळबस्ते मार्गे वळवण्यात आली आहे. (mumbai goa highway parshuram ghat landslide)

पाऊस सुरू झाल्यापासून घाटात किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. शनिवारी रात्री साडेदहा वाजता परशुराम घाटातील देवाची पायवाट या ठिकाणी मातीचा डोंगर रस्त्यावर आला त्यामुळे पूर्ण रस्त्यावर माती पसरली होती. हा प्रकार नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ प्रांताधिकारी कार्यालय संबंधित ठेकेदार आणि पोलिसांना त्याची कल्पना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही बाजूची वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली

mumbai goa highway parshuram ghat landslide
मुख्यमंत्रीपद गेलं, आमदारांनीही साथ सोडली, आता उद्धव ठाकरे काय करणार?

तसेच संबंधित ठेकेदाराने रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम सुरू केले. सुमारे दोन तास दरड हटवण्याचे काम सुरू होते. रस्त्यावरची माती पूर्णपणे बाजूला केल्यानंतर रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक चिरणी मार्गे वळवण्यात आले आहे.

परशुराम घाटात वारंवार दरडी कोसळून मोठी हानी होण्याचा धोका लक्षात घेऊन एप्रिल आणि मे महिन्यात हा घाट काही दिवसासाठी बंद करण्यात आला होता. यादरम्यान घाटातील धोकादायक डोंगरकटाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही दरडी कोसळण्याचे प्रकार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे.

mumbai goa highway parshuram ghat landslide
महापालिकेतील समीकरणं बदलणार; भाजपच्या निशाण्यावर आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.