सेनेने केलेल्या आरोपाला उच्च न्यायालयाची स्थगिती; खेडेकरांना दिलासा

वैभव खेडेकर
वैभव खेडेकर
Updated on

खेड (रत्नागिरी) : खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात राज्य शासनाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर मला न्याय मिळाला आहे, आपले जनसेवेचे काम भविष्यात असेच चालू राहील, अशी प्रतिक्रिया खेडेकर यांनी दिली. स्थगितीनंतर खेडेकर यांच्या समर्थकांनी फटाके वाजवले.

खेड नगरपालिकेतील शिवसेनेच्या नऊ नगरसेवकांनी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पाठवला होता. त्या तक्रारीची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या विरोधात नगराध्यक्षांनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्यावर काल मुंबई उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटिसीला स्थगिती दिली असल्याची माहिती स्वतः नगराध्यक्षांनी मुंबईतून दिली.

वैभव खेडेकर
सोमय्या सोमवारी कोल्हापुरात; मुश्रीफांच्या कारखान्याला भेटणार?

खेडेकर म्हणाले की, मी केलेले काम विरोधकांना पसंत पडले नसावे, त्यांनी याबाबत सभागृहात एकदाही न बोलता थेट जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली, त्याची चौकशी झाली. चौकशीतही आम्ही आमची बाजू मांडली होती. तरीही शासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यावर आज न्यायालयाने या कारणे दाखवा नोटिसीला स्थगिती दिली आहे. मला न्याय मिळाला आहे. आपले जनसेवेचे काम भविष्यात असेच चालू राहील, असे ते म्हणाले. खेडच्या नागरिकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विरोधकांनी सूडबुद्धीने केलेले राजकारण जनतेला समजते, असेही ते यावेळी म्हणाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी खेड शहरात वैभव खेडेकर यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली आणि फटाके वाजवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()