भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Bhoste Ghat Forest : मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी मिरज (Miraj) प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. हा मृतदेह ३ महिन्यांपूर्वीचा असल्याचा अंदाज आहे.
Bhoste Ghat Forest
Bhoste Ghat Forestesakal
Updated on
Summary

योगेश आर्याच्या बोलण्याप्रमाणे शोध घेतल्यानंतर पोलिसांना भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ गुरुवारी (ता. १९) हा मृतदेह सापडला.

रत्नागिरी : खेड भोस्ते घाटातील जंगलात (Bhoste Ghat Khed) सापडलेल्या मृतदेहाचे गूढ वाढतच चालले आहे. सावंतवाडीतील (जि. सिंधुदुर्ग) व्यक्तीच्या स्वप्नामुळे या मृतदेहाचा शोध लागला. मात्र, हा मृतदेह कोणाचा, त्या व्यक्तीलाच कसे कळले... या प्रश्‍नांबाबत पोलिस (Ratnagiri Police) काम करत आहेत. त्यासाठी एक पथक गोव्याला पाठविण्यात आले आहे.

मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी मिरज (Miraj) प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. हा मृतदेह ३ महिन्यांपूर्वीचा असल्याचा अंदाज आहे. खेड आणि गोवा पोलिस ठाण्यात बेपत्ता असलेल्यांचीही माहिती पोलिस घेत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला. पोलिसदेखील या चमत्कारिक प्रकरणामुळे कामाला लागले आहेत.

Bhoste Ghat Forest
इचलकरंजीत 'जर्मनी गँग'ची दहशत; नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, वाहनांची तोडफोड

योगेश पिंपळ आर्या (वय ३०, रा. सावंतवाडी) हा उच्चशिक्षित असून, तो मूळचा बिहारचा आहे. सावंतवाडी आणि गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्याने नोकऱ्या केल्या आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यापासून त्याला हे स्वप्न पडत होते. स्वप्नात खेड रेल्वे स्थानकाचा बोर्ड दिसला. त्यानंतर जंगलातील टॉवर दिसला. त्याने येथे येऊन त्याची खात्री केल्यानंतर योगेश खेड पोलिस ठाण्यात दाखल झाला.

Bhoste Ghat Forest
'या' सात मतदारसंघांत विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून मोठी फिल्डिंग; ढासळलेला बालेकिल्ला पुन्हा उभारण्याचा निर्धार!

डोंगरात पुरुषाचा मृतदेह असून, तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा, असे सांगत आहे, असे त्याने सांगितले. योगेश आर्याच्या बोलण्याप्रमाणे शोध घेतल्यानंतर पोलिसांना भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ गुरुवारी (ता. १९) हा मृतदेह सापडला. त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट आणि या पोषाखाच्या आत मानवी हाडे असल्याचे दिसून आले. मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात, याचा तपास खेड पोलिस करत आहेत.

पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आर्या गोव्याला नोकरी करत असल्याने तेथे काही माहिती मिळते का, यासाठी पोलिसांचे पथक गोव्याला रवाना झाले आहे. खेड पोलिस ठाण्यासह गोव्यातील बेपत्तांची माहिती घेतली जात आहे. आर्या हा आई-वडिलांबरोबर राहात नाही; परंतु त्याचे वडील येथे आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.