शिवसेना व काँग्रेस अशी आमची सत्ता होती आमचा संसार सुखाचा झाला होता पुढील संसारही चांगला होईल
दाभोळ : दापोली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार होता, दोन्ही पक्षातील नेत्यांनी यासाठी तयारीही केली होती, मात्र वरिष्ठ पातळीवर ही निवडणूक शिवसेना व राष्ट्रवादी यांनी एकत्र लढविण्याचे आदेश देण्यात आल्याची चर्चा दापोली शहरात सुरु असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. दोन्हीकडच्या शिलेदारांना आपापल्या तलवारी म्यान कराव्या लागणार आहेत. राष्ट्रवादी सर्वच्या सर्व १७ जागा लढविण्याच्या तयारीत होती, मात्र आघाडी झाल्यास थांबवायचे तरी कोणाला असा प्रश्न दोघांसमोर निर्माण होणार आहे. दोन्ही पक्षातील नाराज, अपक्ष निवडणूक लढवतील वा काहीजण भाजपच्या वळचणीला जाऊ शकतात.
दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना व कॉंग्रेस एकत्र येऊन दापोली नगरपंचायतीची निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. दापोली नगरपंचायतीवर मागील ५ वर्षे शिवसेना व काँग्रेस अशी आमची सत्ता होती आमचा संसार सुखाचा झाला होता पुढील संसारही चांगला होईल असे सांगितले होते. मात्र त्यांनी शिवसेना किती जागा लढविणार व काँग्रेसला किती जागा देणार यासंदर्भात नंतर माहिती दिली जाईल असे सांगितले होते. गुरुवारी (२) मुंबई येथे शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होणार आहे. काँग्रेसला बाजूला ठेऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याची चर्चा दापोलीत सुरू आहे.
काँग्रेसला स्वबळावर लढावे लागणार
२०१६ मध्ये झालेल्या दापोली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस यांची आघाडी झाली. राष्ट्रवादीचे ४ व काँग्रेसचे ४ सदस्य निवडून आले होते. मात्र काँग्रेसने शिवसेनेशी प्रासंगिक करार करून दापोली नगरपंचायतीत सत्ता मिळविली. त्यामुळे २०२१ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर आघाडी केली नाही. शिवसेनेने प्रासंगिक करार कायम ठेवत काँग्रेसला १७ पैकी ६ जागा देण्याचे मान्य केले होते. कोठेतरी माशी शिंकली व शिवसेना - राष्ट्रवादी आघाडी होणार असल्याच्या चर्चेला पेव फुटले. काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढावी लागेल व काँग्रेसची दापोली शहरात किती ताकद आहे हेही कळणार आहे.
* नगरपंचायतीत येणार रंगत
* राष्ट्रवादी- सेना सामना रंगणार होता
* दोन्हीकडील शिलेदाराच्या तलवारी म्यान
* कॉंग्रेसची दापोलीतील ताकद कळेल
"शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीतर्फे दापोली नगरपंचायत निवडणूक लढविण्याचा वरिष्ठानी निर्णय घेतल्यास त्यांचे स्थानिक समितीकडून पालन केले जाईल."
- जयवंत जालगावकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.