काँग्रेसमधून आलेल्यांनी निष्ठावतांना सल्ले देवू नयेत..

nanar project in kokan marathi news
nanar project in kokan marathi news
Updated on

राजापूर (रत्नागिरी) : नाणार रिफायनरीच्या रणामध्ये शिवसेना नेते आणि पदाधिकारी असा शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद रंगलेला असताना नाणारच्या मुद्द्यावरून आमदार राजन साळवी यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जिल्हाप्रमुखांनी माझ्यासारख्या ज्येष्ठाला फुकटचे सल्ले देण्यापेक्षा स्वतः एकहाती काम करण्याची काँग्रेसची पद्धती बंद करावी असा सल्ला त्यांनी चाळके यांना दिला आहे.

विद्यमान जिल्हाप्रमुख हे 10 वर्षे काँग्रेसमध्ये होते व त्यावेळी ते शिवसेनेवर टीका करत होते, आता जिल्हाप्रमुख झाले म्हणून त्यांनी माझ्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलने करून प्रकल्पग्रस्तांसाठी माझ्यासह शिवसेनेचे विभागप्रमुखांसही अन्य 49 शिवसैनिकांनीही 13 दिवसांची पोलिस कोठडी भोगली होती. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध होता म्हणून आजतागायत विविध आंदोलने, मोर्चे, जेलभरो आंदोलने माझ्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

चाळके दहा वर्षे सेनेवर टीका करीत होते

हा लोकाभिमुख लढा यश मिळेपर्यंत चालू ठेवला. अशा माझ्यासारख्या ज्येष्ठ कट्टर व पक्षानिष्ठ शिवसैनिकाला विद्यमान जिल्हाप्रमुखांनी सल्ला देण्यापेक्षा स्वतः एकहाती काम करण्याची काँग्रेसची पध्दत बंद करावी अन्यथा आपल्या गैर कार्यपद्धतीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवावा लागेल.असे साळवी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केले आहे.नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध शिवसेना वादामध्ये शिवसेना नेते आणि पदाधिकारी यांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या.

रिफायनरीचा विषय कधीच संपला

एकमेकांच्या विरोधात शह-काटशहाचे राजकारण करताना सेना नेतृत्वाने संघटनाविरोधी भूमिका घेत प्रकल्प समर्थन करणार्‍यां सेना पदाधिकार्‍यांची उचलबांगडी केली. एवढेच नव्हे, प्रकल्पाचे जाहीर समर्थन करणार्‍या सागवेच्या जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर यांची तडकाफडकी हकालपट्टीची घोषणा करण्यात आली आहे. हा सारा वाद रंगत असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चाळके यांनी पत्रकारांशी बोलताना सेनेचे आमदार साळवी यांनी रिफायनरी संबंधित पक्षाची भूमिका मांडली पाहिजे असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा आमदार साळवी यांनी समाचार घेतला. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच नाणार हा विषय संपला असे जाहीर केले असल्यामुळे माझ्या दृष्टीनेही नाणार रिफायनरीचा विषय कधीच संपला असल्याचेही या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.