'मराठा आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही'

'मराठा आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही'
Updated on
Summary

आरक्षण मिळण्यासाठी समाजाने आपली ताकद दाखवायला हवी. समाजाची एकजूट असेल तर नक्कीच आरक्षण मिळेल.

चिपळूण : खासदार शरद पवार (sharad pawar) हे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी लाचार होतात. पवार हे मराठा समाजातील मोठे नेते आहेत; मात्र ते समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील नाहीत. (maratha reservation) मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवला होता. आरक्षण मिळण्यासाठी समाजबांधवांनी आपली ताकद वापरा, एकजूट ठेवा. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री राणे (narayan rane) यांनी चिपळुणातील कार्यक्रमात दिला.

जन आशीर्वाद यात्रेच्या (jan aashirvad yatra) निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मंगळवारी चिपळुणात अतिथी सभागृहासमोर मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी राणे म्हणाले, मराठा समाजाने माझा सत्कार केल्याबद्दल मी समाजाचा ऋणी आहे. माझ्या अध्यक्षतेखालील असलेल्या तत्कालीन समितीने मराठा समाजाला आरक्षण दिले होते; मात्र काही कारणाने ते टिकले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील नाही.

'मराठा आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही'
'राणेंची नियोजित जन आशीर्वाद यात्रा होणारच!'

आरक्षण मिळण्यासाठी समाजाने आपली ताकद दाखवायला हवी. समाजाची एकजूट असेल तर नक्कीच आरक्षण मिळेल. महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळे मला केंद्रात मोठे मंत्रिपद मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वासाने कॅबिनेट मंत्रिपद दिले. कोकणातील जनतेला या पदाचा मोठा फायदा व्हावा, येथील जनसामान्यांचे जीवनमान उंचवावे, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार मिळावा, रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्रात मंत्रिपदाचा उपयोग करेन.

हप्ते मागण्यासाठी आलो नाही..

शिवसेनेवर टीका करताना राणे म्हणाले, शिवसेनेला मी आतापर्यंत पुरून उरलो आहे. चांगल्या कामात व्यत्यय निर्माण करणारे शिवसैनिक चटणीलाही पुरणार नाहीत. आम्ही जनतेचा आशीर्वाद मागायला आलो आहोत, हप्ते मागण्यासाठी नाही.

'मराठा आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही'
उद्धव ठाकरेंना अटक करा, भाजप समर्थकांची मागणी

पूरग्रस्तांसाठी दिल्लीत पाठपुरावा

केंद्र सरकारने तातडीची ७०० कोटीची मदत पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारला दिली; मात्र अद्याप पूरग्रस्तांपर्यंत ती पोहोचलेली नाही. येथील अनेक गावांचे पुनर्वसन आणि मदतीबाबतची निवेदने आपल्याकडे मिळालेली आहेत. दिल्लीत गेल्यानंतर संबंधित विभागाकडे त्याचा पाठपुरावा पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही नारायण राणे यांनी दिली. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांचा मराठा समाजाच्यावतीने तलवार देऊन सत्कार करण्यात आला.

नारायण राणे म्हणाले...

  • मराठा आरक्षणसाठी राज्य सरकार प्रयत्नशील नाही

  • समाजाची एकजूट असेल तर नक्कीच मिळेल आरक्षण

  • महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाले केंद्रात मंत्रिपद

  • चांगल्या कामात व्यत्यय आणणारे शिवसैनिक चटणीलाही पुरणार नाहीत

  • जनतेचा आशीर्वाद मागायला आलो आहोत, हप्ते मागण्यासाठी नाही

'मराठा आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही'
राणेंच्या घरात घुसून कोथळाच बाहेर काढतो, सेना आमदाराचा तोल ढळला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.