माझ्याकडे दगडफेक करणाऱ्यांची लिस्ट; राणेंचा शिवसेनेला इशारा

narayan rane
narayan ranesakal
Updated on

बांदा ( सिंधुदुर्ग) : माझ्या घरावर दगडफेक करणार्‍यांची 'लिस्ट' आजही माझ्याकडे आहे. त्यामुळे आता माझ्यातील नारायण राणे पुन्हा जीवंत होवू देवू नका, असा इशारा केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे दिला. दरम्यान त्यांनी खासदार संजय राऊत व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका केली. यावेळी राऊत हे 'सामना'च्या पलीकडे जावून काहीही करु शकत नाहीत, हींमत असेल तर त्यांनी पुढ्यात येवून बोलावे, असेही त्यांनी सांगितले.

राणे यांची जन आशीर्वाद यात्रा दुपारी बांद्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी आमदार कालिदास कोळंबकर, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, माजी सभापती प्रमोद कामत, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब, सरपंच अक्रम खान यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Summary

गणेश चतुर्थी नंतर चिपिला विमान उतरेल व उडेलही. विमानतळाचे उदघाटन हे आम्हीच करणार आहोत.

राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास रोखण्याचे काम आघाडी सरकारने केले. मी पालकमंत्री असताना जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे १ लाख ४५ हजार रुपये होते. मात्र आता परिस्थिती दयनीय आहे. मी केंद्रात मंत्री आहे, त्यामुळे गणेश चतुर्थी नंतर चिपिला विमान उतरेल व उडेलही. विमानतळाचे उदघाटन हे आम्हीच करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प निधी अभावी बंद आहेत, हे राज्य सरकारचे अपयश आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाहीत. जिल्ह्यातील रस्त्याची कामे अपूर्ण आहेत, आरोग्य व्यवस्था कमकुवत असल्याने राज्यात कोरोना मृत्युदर हा जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

narayan rane
नारायण राणेंनी अतिशहाणपणा केला; संजय राऊतांचा निशाणा

कोकणी जनतेला आपल्याला व कुटुंबाला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे लोकांचे आशीर्वाद घेऊन त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण याठिकाणी आलो आहोत. माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मीतीवर भर देण्यात येणार आहे. देशाचा जीडीपी वाढविण्याचा मुख्य उद्देश आहे. विविध योजनांवर केंद्र सरकारने साडेचार लाख कोटी रुपये अर्थसाहाय्य केले आहे. त्यातील आतापर्यंत साडेतीन लाख कोटी खर्च करण्यात आले आहेत.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री नारायण राणे व देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात कोकणात विकासाची गती होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने येथील विकासकामांच्या निधीला नेहमीच कात्री लावण्याचे काम केले आहे. कोकणचा रखडलेला विकास केंद्रीय मंत्री नारायण राणेच करू शकतात, हा विश्वास असल्यानेच जनआशीर्वाद यात्रेला लोक गर्दी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()