माझ्या मुलांची कोणीही बरोबरी करू नये ; नारायण राणे

नारायण राणे यांचा इशारा ः कणकवलीत जन आशीर्वाद यात्रेच्या समारोपत संवाद
Narayan Rane
Narayan Ranesakal media
Updated on

कणकवली : केंद्रीय मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्य तसेच माझ्या जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी जनआशीर्वाद यात्रेतून जनतेशी संवाद साधला. याला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळाला. मात्र, वाटेत मांजरा आडवा गेलं असलं तरी मी त्याला घाबरत नाही. मात्र, वैयक्तिक विषय चव्हाट्यावर आणला तर मी ही प्रहार केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे दिला आहे.

येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस असून वेंगुर्ले, दोडामार्ग येथे यात्रा निघाली असताना राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Summary

वैयक्तिक विषय चव्हाट्यावर आणला तर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही.

ते म्हणाले, या यात्रेदरम्यान कोकणातील जनतेचा मला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, काही ठिकाणी अडचणी येण्याचा प्रयत्न केला. मी त्याला घाबरत नाही. कोकणचे आर्थिक परिवर्तन व्हावे. या दृष्टीकोनातून माझा प्रयत्न आहे. यात्रेत अपशकुन झाला त्याची मी दखल घेत नाही. पण माझ्या मुलांबाबत वैयक्तिक आरोप केले जात आहेत. माझ्या मुलांची बरोबरी कोणीही करू नये. त्यांच्याकडून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही. पण वैयक्तिक गोष्टी चव्हाट्यावर आणला तर मी प्रहार केल्याशिवाय राहणार नाही असा प्रतिहल्ला राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांना दिले आहे.

केंद्रातील मोदी सरकार मधील मी जबाबदार मंत्री आहे. माझ्या खात्याचा कारभार उत्तम व्हावा. यातून देशाचा जीडीपी वाढावा. कोकणचा विकास व्हावा त्या दृष्टीने माझा प्रयत्न राहील. राज्यातील सर्व जिल्ह्यांना माझ्या मंत्रालयातून योगदान मिळावे. औद्योगिक क्रांती घडविण्याचा माझा प्रयत्न राहील. येत्या काळात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरून जनतेचे प्रश्न जाणून घेण्याचा आपला प्रयत्न राहील असेही राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांना त्या काळामध्ये जीवाला धोका होता. त्यावेळी मी ढाल करून त्याच्या पाठीमागे राहिलो होतो. मात्र, आताची शिवसैनिक हे माझ्या गाड्यांच्या मागून धावत आहेत.

Narayan Rane
पाटील-महाडिक एकत्र येण्यात काहींचा खोडा; चंद्रकांत पाटील

जन आशीर्वाद यात्रेचा प्रतिसाद पाहता येत्या निवडणुकांमध्ये कोकण हा भाजपचा बालेकिल्ला राहील असेही राणे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. शिवसेना आणि त्यांचे नेते निराशेपोटी या यात्रेत अडचण आणत आहेत. अशी टीकाही राणे यांनी केली आहे. राज्याच्या उद्योगाला बळ देण्यासाठी कोणत्या ही गोष्टी लक्षात न ठेवता राज्यात विकास मी हातभार लावणार आहे. शिवसेनेचे खासदार माझ्याकडे आले तर मी त्यांना उद्योगसाठी सहकार्य करणार आहे.

राणेच्या मंत्रालयाकडे निधी नाही अशी टिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे, असे विचारता राणे म्हणाले, मी अजून राष्ट्रवादीकडे वळलो नाही. तुझा तिजोरीत खडकडाट असल्याने तु केंद्राकडे हात पसरतोस, राज्यातील शेतकऱ्यांना, पुरग्रस्तांना , एसटीचे पगार देण्यासाठी पैसानाही ही राज्याची अवस्था आहे. एका रात्रीत आपल्यावरी गुन्हे काढून टाकण्यासाठी पदाची शपत घेणाऱ्या अजित पवारने मला तोंड उघडायला लावू नये असा इशाराही राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.