कणकवली (सिंधुदुर्ग) : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नंड्डा (J. P Nadda) यांच्या सूचनेनुसार कोकणात आयोजित करण्यात आलेली भाजपची जन आशीर्वाद (jan ashirwad yatra )यात्रा ही होणार असून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) या यात्रेमध्ये उद्या (ता. २७ ) सकाळी नऊ वाजता रत्नागिरी (Ratnagiri)येथे सहभागी होऊन २८ आणि २९ तारीखला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जनआशीर्वाद यात्रा आपला नियोजित कार्यक्रम पूर्ण करेल, अशी माहिती भाजप जनआर्शिवाद यात्रेचे संयोजक तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला कणकवली पंचायत समितीचे सभापती मनोज रावराणे, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष कानडे, सोनू सावंत, सुशील सावंत आदी उपस्थित होते.
जठार म्हणाले, `मंत्री नारायण राणे हे उद्या सकाळी ९ वाजता रत्नागिरी येथील विमानतळावर उतरणार असून तेथूनच जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल. ही यात्रा लांजा ते राजापूर अशी पुढे येणार असून खारेपाटण येथे सिंधुदुर्गाच्यावतीने राणेंचे जिल्ह्यामध्ये स्वागत केले जाईल. जिल्हात २८ आणि २९ ला विविध तालुक्यामध्ये यात्रा जनसामान्याला भेटण्यासाठी ठिकाणी जाणार आहे. याचे नियोजन उद्यापर्यंत जाहीर होणार आहे.
केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ऱाणे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. याचा उद्देश असा आहे की, केंद्रातील मोदी सरकारने सात वर्षांमध्ये केलेल्या विविध विकास कामांची माहिती जनमानसापर्यंत पोहोचवायची आहे. तसेच गेल्या दोन वर्षात कोरोना व्हायरसच्या साथरोगामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. व्यवसाय डबघाईस आलेले आहेत. त्यामुळे कोकणातील उद्योगधंद्यांना उभारी देण्यासाठी आणि व्यवसायिकांची माहिती जाणून घेण्यासाठी मुळात ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेमध्ये भाजपचे कार्यकर्ते कोणतेही चुकीचे काम करणार नाहीत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा आपल्या भाषणांमध्ये जनतेला उद्देशून स्पष्ट केले आहे की, यापुढे कोरोनासोबत जगायला पाहिजे हीच भूमिका आमची असून आम्ही कोरोना सोबत घेऊन पण कोरोनाचे नियम पाळून ही यात्रा यशस्वी करू. राणेंचे ठिकठिकाणी उत्स्फुर्तपणे स्वागत होणार आहे. राज्याच्या राजकारणात मंत्री ते मुख्यमंत्री अशी विविध पदे त्यांनी सांभाळली आहेत. त्यामुळे कोकणात त्यांचा मोठा जनसंपर्क असून अनेक लोक त्यांना मानणारे आहेत. त्यामुळे प्रथमच जिल्ह्यात केंद्रीय मंत्री म्हणून येत असताना त्यांचे दिमाखदारपणे स्वागत होईल आणि त्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. या यात्रेला स्थानिक प्रशासनाकडून विरोध होणार नाही. त्यासाठी सरकारला सुबुद्धी येवो. यात्रा निश्चितच चांगल्या पद्धतीने पार पडेल.
यात्रा सफल होऊन विरोध होणार नाही
जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी केंद्री मंत्री नारायण राणे यांची ही जन आर्शिवाद यात्रा आहे. याला जिल्हात जरी मनाई आदेश असला तरी विरोद होणार नाही. आमचे कार्यकर्ते संयमाने या यात्रेत सहभागी होतील. जनतेच्या विकासासाठी आणि मोदी सरकारेने केलेल्या कामांची माहीती तळागाळात पोहचवण्यासाठी ही यात्रा आहे. त्यामुळे ही यात्रा र्निविघ्न पार पडले असे सांगत, यात्रेसाठी परवानगी घेणार काय या प्रश्नाला जठार यांनी बगल दिली आहे.
आमदार नाईक यांनी इतिहास समजून घ्यावा
नारायण राणे यांची संभाजी राजेंशी केलेल्या तुलनेच्या विरोधात प्रमोद जठार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. या विषयी त्यांना विचारले असता जठार म्हणाले, मुळात वैभव नाईक यांनी इतिहास समजून घ्यावा. संगमेश्वर मधील छत्रपती संभाजी राजांचा दाखला दिला होता. छत्रपतींची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. हे सत्य आहे. मात्र, विनाकारण काही मंडळी मराठा समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. नाईकांना जर गुन्हा दाखल करायचा असेलच तर तो संजय राऊत यांच्यावर करावा त्यांनी यापुर्वी मराठा समाजाच्या मोर्चाला मुखा मोर्चा असे व्यंगचित्र छापले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.