मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा म्हणत फिनिक्स पक्षाप्रमाणे ते घेत आहेत झेप ...
मंडणगड (रत्नागिरी) - मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा यानुसार मंडणगड मधील ग्रामस्थ फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. डोळ्यातील अश्रू पुसून पुन्हा उभारी घेण्यासाठी हातात हात घेऊन कामाला लागले आहेत. प्रत्येक व्यक्ती निसर्ग वादळाच्या भयानक आठवणीतून सावरण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत.
निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाने गावेच्या गावे उध्वस्त झाली आहेत. आज चौथ्या दिवशी त्या वादळाच्या आठवणीतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडणगड वासियाची स्थिती नितिन कस्तुरे यांनी सकाळ पुढे मांडली.
कुटुंब बेघर झाली आहेत. सर्वस्व चक्रीवादळाने पावसासोबत धुवून नेले, पण हे वादळ माणसाची हिम्मत मात्र हिरावून घेऊ शकला नाही. पणदेरी, घुमरी, आंबवणे बु शिगवण, आंबडवे , तुळशी व इतर सर्व गावातील लोक पुन्हा नव्या उमेदीने, नव्या जोमाने संसार उभे करण्यात गुंतले आहेत. संपूर्ण दिवसभर एकत्र येऊन पडलेल एक एक घर कसे तयार होईल आणि उध्वस्त संसाराची घडी कशी बसवता येईल यासाठी प्रत्येक कुटुंबाचाही धावपळ सुरु झाली आहे. आंबवणे बु गावातील10 ते 15 जण एकत्र येऊन दोन चार घरातील शिल्लक राहिलेल कौल, रिपा, वासे गोळा करत एक चांगले घर बनवण्यात गुंतलेले आहेत. आतापर्यंत गावातील 10 ते 12 घरे सर्वांच्या सहकार्याने तयार झाली. यात तरुणाईचा मोठा वाटा आहे रवींद्र खेरटकर, अंकेश भुवड, विश्वास भुवड, समीर खेरटकर, प्रमोद धामणे, आशीर्वाद धामणे, धर्मेश चोरगे यांच्यासह गावातील सर्वानी एकीचे बळ दाखवून दिले.
नारायण बांदरें या युवकाने तर मुंबई हुन जेवढा शक्य होईल तेवढे प्लास्टिक कागद गावाला आणला. त्यामुळे पावसापासून संरक्षण होण्यास मदत झाली. स्वतः गावातील वैद्यकीय अधिकाऱ्यां सोबत वैद्यकीय सुविधेसाठी फिरत आहे. ना कोरोनाची भीती ना कसले मतभेद यावेळी पाहायला मिळत होते. पाणवठ्याकडे जाणारे रस्ते त्यात पडलेली झाडे, पत्रे आदी सर्व एकजुटीने बाजूला करून रस्ते ही पूर्वीप्रमाणे तयार करत आहेत. येणाऱ्या असंख्य अडचणींवर मात करत पडलेले संसार उभारण्याची कसरत गावागावात सुरु आहे.
आंबडवे गावातील असेच घर दुरुस्ती करत असताना ग्रामस्थ सुदर्शन सकपाळ छतावरून पाय घसरून खाली पडले. वैद्यकीय सेवेची नित्यांत गरज ओळखून गावातील नागरिक नरेंद्र सकपाळ, संकेत सकपाळ व इतर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आंबडवे ते घोसाळे फाटा हा रस्ता झाडे तोडून विजेचे तारा खांब बाजूला सारून वैद्यकीय सेवेसाठी रुग्णाला मंडणगड व तद्नंतर महाड येथे पोहोच केले. या कार्यात नरेंद्र सकपाळ हे जणू देवदूत च ठरले. रस्तावरची भली मोठी झाडे केवळ या ग्रामस्थांच्या मदतीने कोणतीही जेसिबी व इतर सुविधा नसताना दूर झाली. जिथे चालता येणे शक्य नव्हते, तेथे बाईक जाईल असा रस्ता करून एक आदर्श निर्माण केला.
घराचे स्वप्न स्वप्नच राहिल की काय?
मंडणगड तालुक्यापासून जवळच असणाऱ्या बोरघर गावातील एका महिलेच स्वप्नच उध्वस्त झाले.घरकुल योजने अंतर्गत काम नुकतेच पूर्णत्वास गेले होते. मागील आठवड्यात या महिलेचे घरावरती पत्रे बसवून झाले होते. आता घरात राहून आपले स्वप्न पूर्ण होणार ही आशा लागली होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 2 दिवसापूर्वी बसवलेले पत्रे आज डोळ्यासमोर फक्त कचऱ्याचा ढीग बनून उभे आहेत. त्याच्या मनाने तर अबोलाच धरला आहे. घराचे स्वप्न स्वप्नच राहणार काय? हा प्रश्न सतत डोक्यात घोळत आहे.
पत्र्याची कमतरता
मंडणगड तालुक्यात पत्र्याची खूपच कमतरता आहे.
पत्र्याची असणारी घराचे छत उडून गेले आहेत त्यामुळे पत्रे बसवणे व पावसापासून सरंक्षण करणे गरजेचे आहे.तुळशी या गावाला या वादळाचा मोठा तडाखा बसला येथिल ग्रामस्थ संजय शेडगे यांनी गावात पत्रे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली. मंडणगड, खेड, दापोली, महाड येते पत्रे नसल्याने त्यांनी थेट सावर्डे चिपळूण येथून त्यांच्या घरासह इतर सर्वाना मिळतील असे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.