Ajit Pawar: आम्ही काही साधूसंत नाही...; घेतलेल्या वेगळ्या भूमिकेबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

कर्जतमधील निर्धार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण घेतलेल्या वेगळ्या भूमिकेबाबत भाष्य केलंय.
 ncp Ajeet pawar
ncp Ajeet pawar
Updated on

रायगड- कर्जतमधील निर्धार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण घेतलेल्या वेगळ्या भूमिकेबाबत भाष्य केलंय. ते म्हणाले की, 'आम्ही ही भूमिका का घेतली? असं अनेकांना वाटत असेल. पण, आम्ही काही साधूसंत नाही. आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलंय, विविध सरकारमध्ये काम केलंय.'

देशपातळीवरील पक्षांवर एक नजर टाकली तर वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या पक्षांसोबत जातात. पण, आपली विचारधारा सोडत नाही. मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की, आमची विचारधारा स्पष्ट आहे. आमचा अल्पसंख्याक, मागासवर्ग, आदिवासी समाज यांनी आपापल्या भागात एकोप्याने राहावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी हीच भूमिका घेतली आणि स्वराज्याची स्थापना केली. त्याच मार्गावर जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या योजनांचा फायदा देशातील जनतेला मिळत आहे. त्यांच्या नेतृत्त्वात आम्ही जनतेच्या कल्याणाच्या योजना राज्यात आणत आहोत, असं पवार म्हणाले. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांच्या दारात जाऊन त्यांना लाभ देण्याचा काम महायुतीचे सरकार करतंय, असंही ते म्हणाले.

 ncp Ajeet pawar
NCP Political Crisis : ...म्हणून राष्ट्रवादी पक्ष मूळ आमचाच; अजित पवार गटाचा दावा

सध्या महाराष्ट्राच्या वातावरणात वेगळं चित्र पाहायला मिळतंय. सगळ्यांना आपापलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे. आपली भूमिका मांडताना समाजात तेढ निर्माण होणार नाही. वाद होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण हवंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी भूमिका मांडली जात आहे, असं ते म्हणाले.

आदिवासी, मराठा, धनगर समाजाला आरक्षण मिळावे असे वाटते. ओबीसी समाजाला वाटते आमच्यात अनेक वर्ग आहेत त्यामुळे आणखी वर्ग यात आणू नये. सर्व पक्षांची बैठक घेतली आहे. सर्वांनी एकमताने सांगितलं की सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता इतरांना आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे. मतमतांतरे असतील. विचार पटले नाही तर चर्चा व्हायला हवी, असं पवार म्हणाले.

 ncp Ajeet pawar
महायुतीत मिठाचा खडा! शिवसेनेचा लोकसभेसाठी अजित पवार गटाला जागा सोडण्यास विरोध?

मला डेंग्यू झाला. तेव्हा अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाला अशी चर्चा झाली. मी असा काही लेचापेचा नाही. जे आहे ते तोंडावर आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना पुढे घेऊन आम्ही पुढे जातोय. आपली विचारधारा पक्की ठेऊन जर आपल्याला काम करता येत असेल. यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेऊन पुढे जात असू तर मग सत्तेत सहभागी झालो तर बिघडलं कुठं? असा सवाल त्यांनी केला. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.