राष्ट्रवादीला होणार फायदा? निवडणुकीची सुत्रं सेनेच्या माजी आमदारांकडे

शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस यांची आघाडी झाल्यावर काँग्रेस आणि शिवसेनेचे जुळलेले सूर अबाधित राहिले.
shivsena-ncp
shivsena-ncpesakal
Updated on

खेड : शिवसेनेचे सूर्यकांत दळवी (Surykant dalavi) व विद्यमान आमदार योगेश कदम (Yogesh kadam) यांच्यात गेल्या पाच ते साडेपाच वर्षात संघर्ष होताना मतदारांनी पाहिला आहे. दळवी व राष्ट्रवादी (NCP) ही युती नेहमी राष्ट्रवादीच्या फायद्याची ठरल्याचा इतिहास आहे. सध्या दापोलीत (Dapoli) शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीच्या युतीची सूत्रे दळवी यांच्याकडे गेली आहेत. त्यामुळे शिवसैनिकात अस्वस्थता पसरली आहे.

स्थानिक पातळीवर समीकरणे जुळविण्यात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) व रामदास कदम (Ramdas kadam) यांची प्रमुख भूमिका असे. मात्र आत्ता दळवी यांनी समोर येत नगरपंचायत निवडणुकीपूर्वीच आघाडी घोषित केली. २०१४ मध्ये दापोलीत तत्कालीन शिवसेना आमदार सूर्यकांत दळवी यांचा राष्ट्रवादीच्या संजय कदम (Sanajay Kadam) यांच्याकडून पराभव झाल्यानंतर दोन्ही नगरपंचायतींसह खेड नगर पालिकेवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. डिसेंबर २०१६ मध्ये दापोली व मंडणगड नगरपंचायतीमध्ये शिवसेनेची पिछेहाट झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. परंतु या कालावधीत दळवी यांनी पुन्हा आपल्या अपयशाचे खापर हे स्वपक्षीय नेत्यांवर फोडून राजकारणापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. योगेश कदम यांनी काँग्रेसबरोबर (Congress) आघाडी करीत दापोली नगरपंचायतमध्ये (Nagara Panchayat Election 2021) सत्ता खेचून आणली. मंडणगडमध्ये राष्ट्रवादीच प्रबळ ठरली होती. २०१६ मध्ये खेड नगर पालिकेच्या निवडणुकीत देखील २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुक निकालाचा परिणाम झाल्याचे दिसून येतो.

shivsena-ncp
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं; सख्खे 4 भाऊ 'आमदार'

राज्यामध्ये दोन वर्षांपूर्वीच शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस यांची आघाडी झाल्यावर दापोलीत काँग्रेस आणि शिवसेनेचे जुळलेले सूर अबाधित राहिले. राष्ट्रवादीबरोबर मात्र सूर जुळणे शक्य नव्हते. कारण दोन्ही कदमांचा संघर्ष. तसेच संजय कदम, खासदार तटकरे यांनी राष्ट्रवादी वाढवण्याचा केलेला प्रयत्न व राजकीय प्रयोग त्याला कारणीभूत आहेत. खेड पालिकेत मनसेबरोबर केलेली जवळीक तर दापोलीमध्ये राष्ट्रवादीने मनसे व प्रसंगी माजी आमदार सूर्यकांत दळवी समर्थकांशी केलेली जवळीक सेना विसरू शकत नाही. दळवींनी राष्ट्रवादीसोबत बांधलेल्या राजकीय गाठीचा फायदा सेनेपेक्षा राष्ट्रवादीलाच होईल, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

"संघटनेचा आदेश आम्ही मानतो पण यापूर्वी माजी आमदार दळवी यांनी मतदार संघात उधळलेली मुक्ताफळे आम्ही (तालुका कार्यकारिणीने) वरिष्ठांना कळवूनदेखील त्यांच्यावर कारवाई नाही. संघटनेला मेहनत घेऊन पुनरुज्जीवित करणाऱ्यांना चार दिवसापूर्वी स्थानिक पातळीवर आघाडी केलेले निष्ठेचे बाळकडू पाजत आहेत."

- उन्मेष राजे, तालुका संघटक

shivsena-ncp
Miss Universe 2021: हरनाज संधूच्या 'या' उत्तराने जिंकली परीक्षकांची मनं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.