Maharashtra NCP Crisis : ना कार्यकर्त्यांशी चर्चा, ना कोणता निर्णय.. अजितदादांना का पाठिंबा दिला? आमदार निकम करणार उलगडा

Amdar Shekhar Nikam : आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
MLA Shekhar Nikam
MLA Shekhar Nikamesakal
Updated on
Summary

आमदार निकम यांनी भूमिकेचा उलगडा केला तरी कार्यकर्ते काय सांगणार, याकडेही लक्ष लागलेले आहे.

Chiplun News : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Crisis) बंडाचे निशाण फडकवत सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यातील राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी त्यांना पाठिंबाही दिला.

MLA Shekhar Nikam
NCP Crisis : कोणाला पाठिंबा न देताच 'हा' आमदार युरोप दौऱ्यावर? पाटलांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच!

जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकमेव आमदार असलेल्या शेखर निकमांनीही (Shekhar Nikam) अजित पवारांना साथ दिली. हा निर्णय का घेतला त्याचा उलगडा होण्यासाठी सावर्डे येथे रविवारी (ता. ९) सकाळी ११ वा. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

MLA Shekhar Nikam
Rain Update : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार; सात बंधारे पाण्याखाली, पंचगंगेच्या पाणीपातळीत 4 फुटांची वाढ

आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे व या निर्णयाशी ते ठाम आहेत. निर्णय घेण्याची प्रक्रिया ही एवढ्या कमी वेळेत झाली की, आमदार शेखर निकमांना कार्यकर्त्यांसोबत कोणतीही चर्चा करण्यासाठीचा अवधी मिळालेला नाही. याबाबतची खंत त्यांच्या मनातदेखील आहे.

या नंतरच्या दोन-तीन दिवसातील चालू राजकीय घडामोडींमुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद झाला नाही. चिपळूण तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आमदार शेखर निकम यांच्यासोबत राहावा यासाठी घेतलेल्या निर्णयाबाबतची भूमिका मांडण्यासाठी व सविस्तर चर्चा करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

MLA Shekhar Nikam
Rain Update : 'जगबुडी'ने ओलांडली धोक्याची पातळी; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, बंदररोड पाण्याखाली

हा मेळावा ९ जुलैला सकाळी ११ वाजता आयटीआय कॅम्पस, सावर्डे सभागृहात होणार आहे. यासाठी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांना निमंत्रित केले आहे. यामध्ये आमदार निकम यांनी भूमिकेचा उलगडा केला तरी कार्यकर्ते काय सांगणार, याकडेही लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.