NCP News: मुस्लिम समाजाला राष्ट्रवादीकडं खेचण्यासाठी जोरदार हालचाली; शरद पवारांना पाठिंबा देणारे 'मुकादम' दादांच्या गोटात!

बहुसंख्य मुस्लिम समाज (Muslim Community) शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर (NCP) आहे.
Muslim community NCP Crisis
Muslim community NCP Crisisesakal
Updated on
Summary

चिपळूणचे माजी सभापती शौकत मुकादम (Shaukat Mukadam) यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले.

चिपळूण : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपप्रणीत महायुतीत सामील झाल्याने जिल्ह्यातील मुस्लिम समाज दुखावला आहे. बहुसंख्य मुस्लिम समाज (Muslim Community) शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर (NCP) आहे. चिपळूणमधील मुस्लिम समाजाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे खेचण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून चिपळूणचे माजी सभापती शौकत मुकादम (Shaukat Mukadam) यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले.

माजी आमदार रमेश कदम यांना मानणारा बहुसंख्य मुस्लिम समाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे किती आकर्षित होईल. निवडणुकीत हा समाज कुणाच्या बाजूने राहील, हे भविष्यकाळात स्पष्ट होईल.

Muslim community NCP Crisis
लोकसभेसाठी मास्टर प्लान; मंत्रीपदाचा राजीनामा देऊन 'हा' बडा नेता निवडणूक लढवणार? कन्येलाही मिळणार संधी!

शौकत मुकादम यांची राजकीय वाटचाल इंदिरा काँग्रेसमध्ये माजी खासदार (कै.) गोविंदराव निकम, माजी आमदार (कै.) नाना जोशींच्या मार्गदर्शनाखाली युवक अध्यक्षपदापासून झाली.

कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या आंदोलनातून ते चर्चेत आले. त्यांचे बोलणे मिश्किल आणि भाषण विनोदी असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

ते धर्मनिरपेक्ष असल्यामुळे पेढे पंचायत समिती गणात मुस्लिमांची १०० मते नसताना ३२० मतांनी निवडून आले होते. रमेश कदमांनी त्यांना पंचायत समितीचे सभापती बनवले.

पक्षाचे तालुकाप्रमुखपद देत काम करण्याची संधी दिली; मात्र मागील काही वर्ष आपल्याला निर्णयप्रक्रियेत डावलले जात असल्याची त्यांची तक्रार होती. त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली.

Muslim community NCP Crisis
Loksabha Election : कर्नाटकात मोठी उलथापालथ! लोकसभेची निवडणूक काँग्रेसला जड जाणार? BJP-JDS युतीच्या हालचाली

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवडताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही, हे त्यांनी उघडपणे पक्षाकडे बोलून दाखवले होते. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न त्यांनी हाताळला.

झाडे लावा झाडे जगवा, बाटा लागवड यातून पर्यावरणप्रेमी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार हे कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा शौकत मुकादम चिपळूणमधून पवारांच्या भेटीला जाणारे ते एकमेव पदाधिकारी होते.

Muslim community NCP Crisis
Deepak Kesarkar : B.Ed., D.Ed धारकांसाठी आनंदाची बातमी! शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय

शरद पवारांच्या कराड दौऱ्यात सहभागी होत त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे लक्ष वेधून घेतले. चिपळूणचा बहुसंख्य मुस्लिम समाज हा माजी आमदार रमेश कदम यांच्या पाठीशी आहे.

शौकत मुकादम आणि रमेश कदम एकत्र राहिले तर चिपळूणमधील मुस्लिम समाज अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून लांब जाईल, हे लक्षात आल्यानंतरच वेगवान घडामोडी घडल्या आणि शरद पवारांना पाठिंबा देणारे मुकादम सावर्डे येथे झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात व्यासपिठावर दिसले.

त्यानंतर पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. या जबाबदारीने मुकादम प्रदेशपातळीवरील राजकारणात सक्रिय होतील; परंतु मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी अजित पवार गटाची ही खेळी कितपत यशस्वी होईल, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.

Muslim community NCP Crisis
NCP Crisis : जयंत पाटलांचा कट्टर विरोधक अजितदादांच्या गळाला; 'या' नेत्याला मिळाली पक्षात येण्याची ऑफर!

मला पदाची अपेक्षा नाही. राजकारणात सक्रिय असताना वैयक्तिक स्वार्थ कधी पाहिला नाही. कुणाचा एक रुपया न घेता कोकण रेल्वेत अडीचशे लोकांना रोजगार मिळवून दिला.

पक्षाने सन्मानाने पद दिले आहे त्याचा सामान्य लोकांसाठी वापर करेन. लोकहिताची काही कामे मी सुचवली आहेत. पक्षनेतृत्वाने ते करण्याचे मान्य केले आहे. शरद पवार आणि अजित पवार दोन्ही आमचे नेते आहेत. आमच्या घरातले भांडण लवकरच मिटेल.

- शौकत मुकादम, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.