उधाणामुळे मिऱ्या बंधाऱ्याला मोठे भगदाड; रस्ताही गेला वाहून

अपेक्षित निधी उपलब्ध झाल्याने फक्त बंधाऱ्याची मलमपट्टी करण्यात आली.
उधाणामुळे मिऱ्या बंधाऱ्याला मोठे भगदाड; रस्ताही गेला वाहून
Updated on

रत्नागिरी : समुद्राच्या उधाणाने मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे. पंधारमाड येथे अजस्र लाटांनी मोठे भगदाड पाडले आहे. बंधाऱ्याबरोबर रस्ता वाहून गेला आहे. तेथील पेजे यांच्या घरात समुद्राचे पाणी घुसण्याची भिती निर्माण झाली आहे. रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. प्रशासनाने तत्काळ वाहून गेलेल्या बंधाऱ्याचे काम करून आमचे संरक्षण करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच पांढरा समुद्र येथील रेतीचा काही भाग वाहुन गेला होता. त्यामुळे समुद्राचा प्रवाह बदलून पुन्हा पांढरा समुद्राकडे येण्याची भिती व्यक्त होत होती. मात्र आजच्या उधाणाच्या भरतीने मिऱ्याचा धोका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पंधरामाड, भाटी मिऱ्या, आलावा भागात समु्द्राच्या उधाणामुळे सात ठिकाणी बंधाऱ्याला धोका निर्माण झाला होता. सुमारे ९४ कोटीचे हे काम होते. मात्र त्याला अपेक्षित निधी उपलब्ध झाला नाही. फक्त बंधाऱ्याची मलमपट्टी करण्यात आली.

उधाणामुळे मिऱ्या बंधाऱ्याला मोठे भगदाड; रस्ताही गेला वाहून
ब्रीद ठरवले सार्थ; सलग 72 तास सेवा देणाऱ्या कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सलाम!

कायमस्वरूपी उपययोजना म्हणून सुमारे साडेतीन किमीचा १९० कोटीचा मिऱ्या बंधारा मंजूर आहे. परंतु त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी काही वर्ष जाणार आहेत. तोवर समुद्राचे अतिक्रम सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाला तात्पुरत्या तातडीच्या उपाय योजना करणे आवश्यक आहे. मिऱ्या पंधारमाड येथे आज उधाणाच्या भरतीने पुन्हा दणका दिला आहे. समुद्राच्या अजस्र लाटांनी बंधाऱ्यासह रस्ताही गिळंकृत केला आहे. वेळीचा या बंधाऱ्याची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी जवळच्याच पेजे यांच्या घरात शिरण्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली. तेथील रहिवाशांचा जीव भितीने टांगणीला लागला आहे.

मिरकरवाडा बंदरात साचणारा गाळ रोखण्यासाठी ब्रेक वॉटरवॉल बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा प्रवाह बदलून थेट मिऱ्याच्या दिशेने जातो. या प्रवाहाला प्रचंड दाब असल्याने उधाणाने वारंवार बंधाऱ्याची धुप होत आहे. प्रशासनाने त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.

उधाणामुळे मिऱ्या बंधाऱ्याला मोठे भगदाड; रस्ताही गेला वाहून
जिन्नस नकोय, पाणी हवय, पाणी..; चिपळुणातील गृहिणी हताश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.