Hornbill Bird : राजापुरात सुरंगीच्या ढोलीत धनेशच्या नव्या पिढीचा जन्म; नव्वद दिवस नर-मादीकडून पिल्लाचं संरक्षण

शहरातील मध्यवर्ती भागामध्ये धनेश पक्ष्याची ढोली पक्षीमित्र धनंजय मराठे यांना तीन महिन्यांपूर्वी आढळून आली होती.
Hornbill Bird in Rajapur
Hornbill Bird in Rajapuresakal
Updated on
Summary

सुरंगीच्या झाडावरील ढोलीमध्ये धनेश पक्ष्याचे गेली दोन-तीन वर्ष वास्तव्य आहे. यावर्षीही धनेश पक्ष्याच्या मादीने या ठिकाणी अंडी घातली होती.

राजापूर : धनेश पक्ष्यांची (Indian Birds) विविध कारणांमुळे दिवसागणिक घटत जाणाऱ्‍या संख्येबाबत पक्षीप्रेमींमधून चिंता व्यक्त केली जात असताना शहराच्या मध्यवर्ती भागातील सुरंगीच्या झाडावरील ढोलीमध्ये धनेश पक्ष्याच्या (Hornbill Bird) नव्या पिढीने जन्म घेतला होता. ढोलीमध्ये (घरट्यामध्ये) मादीने अंडी घालण्यापासून पिल्लांचा जन्म होऊन ती ढोलीतून बाहेर येईपर्यंतच्या सुमारे नव्वद दिवसांच्या जन्मप्रवासानंतर धनेश पक्ष्याच्या पिल्लाने सकाळी अवकाशामध्ये झेप घेतली.

शहरातील मध्यवर्ती भागामध्ये धनेश पक्ष्याची ढोली पक्षीमित्र धनंजय मराठे यांना तीन महिन्यांपूर्वी आढळून आली होती. ढोलीची रचना, तिची जमिनीपासूनची उंची, तिच्या आजुबाजूचा परिसर व सुरक्षितता आदींना प्राधान्य देत झाडावरील ढोलीची धनेश पक्ष्याच्या नर-मादीकडून निवड करण्यात आली. ढोलीत बसल्यावर मादीला सुखकर होईल इतपत ढोलीतील खोलीची उंची ठेवून छोटे दगड आणि झाडाच्या साली आणून योग्य त्या उंचीची रचना करण्यात आली.

Hornbill Bird in Rajapur
Almatti Dam : 'अलमट्टी धरण' सांगली, कोल्हापुरातील महापुराचे मुख्य कारण; कृष्णा कृती समितीचे महाराष्ट्राला 'हे' आवाहन

ढोलीमध्ये बसलेल्या मादीची चोच ढोलीच्या बाहेर येईल एवढीच खाच ठेवत ढोलीच्या गोलाईचा बाह्य भाग पक्ष्याकडून मातीने लिपण्यात आला. मादी ढोलीत बसल्यापासून नर मादीला आणि पिल्लू जन्माला आले की, पिल्लाला विविध प्रकारचा रानमेवा आणून भरवण्याचे काम करीत होता. पिल्लाची बऱ्यापैकी वाढ झाल्यांतर, मादी अन्नाच्या शोधात बाहेर पडल्यानंतर पिल्लाच्या सुरक्षेसाठी एकावेळी एकजण घरट्याच्या बाहेर नर-मादीपैकी एकजण थांबत होते.

सुरंगीच्या झाडावर तिसऱ्या वर्षी धनेशचे घरटे

शहराच्या मध्यवर्ती भागातील सुरंगीच्या झाडावरील ढोलीतील धनेश पक्ष्याच्या सलग तिसऱ्या वर्षी नवजात पिल्लाचा जन्म झाल्याने सुरंगीचे हे झाड धनेश पक्ष्याच्या जीवनप्रवासाचा एकप्रकारे साक्षीदार झाल्याची माहिती पक्षीमित्र धनंजय मराठे यांनी दिली. जन्मदाते नर आणि मादी तीच आहेत का, हे सांगणे अनिश्‍चित असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. पुढील वर्षी धनेश पक्ष्याने या विणीच्या हंगामामध्ये या ठिकाणी वास्तव्य केल्यास निश्‍चितच त्याच्या निरीक्षणाच्या नोंदी ठेवून अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Hornbill Bird in Rajapur
Dizziness Symptoms : चक्कर येण्याची कोणती आहेत कारणे? यावर कसा करता येईल उपाय? जाणून घ्या..

सुरंगीच्या झाडावरील ढोलीमध्ये धनेश पक्ष्याचे गेली दोन-तीन वर्ष वास्तव्य आहे. यावर्षीही धनेश पक्ष्याच्या मादीने या ठिकाणी अंडी घातली होती. नवजात पिल्लाच्या जीवनप्रवासाची अनुभूती निश्‍चितच आनंददायी होती. ढोलीसह येथील परिसरातील सुरक्षेमध्ये नगर पालिका, वनविभाग आणि पक्षीप्रेमींची भूमिका महत्वाची ठरली आहे. धनेश पक्ष्याच्या जतन आणि संवर्धनासाठी ही महत्त्वपूर्ण बाब म्हणावी लागेल.

-धनंजय मराठे, पक्षीमित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.