कातळशिल्पांचे घर म्हणून चिपळूणचाही उल्लेख होणार ; ऐतिहासिक वारसात पडणार भर

new katal shilp home identity of chiplun in ratnagiri
new katal shilp home identity of chiplun in ratnagiri
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह लांजा, रत्नागिरी, राजापूर तालुक्‍यासह आता कातळावर आढळणाऱ्या कातळशिल्पांचे घर म्हणून चिपळूणचाही उल्लेख होणार आहे. चिपळूण तालुक्‍यात अशी कातळशिल्पे आजपर्यंत आढळली नव्हती. मात्र, वीर-पिलवली सीमेनजीक राक्षसमोडा येथे कातळशिल्पे आढळली असून चिपळूण तालुक्‍याच्या ऐतिहासिक वारसात भर पडली आहे. 

जगभरातील इतिहास संशोधकांचे या वारसाकडे लक्ष वेधले आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा या तालुक्‍यासह गुहागर व दापोली येथेही तुरळक ठिकाणी कातळशिल्पे आढळली आहेत. यात या नवीन ठिकाणची भर पडली आहे. तालुक्‍यातील वीर-पिलवली येथील ही कातळशिल्पे स्थानिक लोकांना अनेक वर्षापासून ज्ञात होती; मात्र त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. वीर येथील स्थानिक ब्लॉगर नितेश दुर्गोळी व निसर्गप्रेमी अनंत दुर्गोळी यांनी या कातळशिल्पांना भेट देऊन काही निरीक्षणे नोंदवली आहेत. 

कातळशिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबूड यांना याबाबत माहिती दिली. या कातळशिल्पाचे व्हिडिओ चित्रीकरण करून नितेश दुर्गोळ यांनी आपल्या यू ट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केल्याने ही कातळशिल्पे प्रकाशात आली आहेत. चिपळूण तालुक्‍यातील वीर-पिलवली सीमेलगत आढळणाऱ्या राक्षसमोडा या विस्तीर्ण कातळ सड्यावर ही कातळशिल्पे अनेक वर्षापासून खोदलेली आहेत. 

आख्यायिका चिकटली 

या कातळशिल्पांविषयी स्थानिक नागरिकांकडून एक आख्यायिका सांगितली जाते. येथे देव आणि राक्षस यांचे युद्ध झाले होते. या युद्धात देवांनी राक्षसांचा पराभव केला होता. या युद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ ही कातळशिल्पे खोदण्यात आली. कातळशिल्पे अभ्यासक सुधीर रिसबूड या कातळशिल्पांना आपल्या टीमसह भेट देणार आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.