रत्नागिरी : नव्या वर्षामध्ये परिवहन आयुक्तांनी वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियमांची कडक अंमलबजवाणी सुरू केली आहे. रस्ता सुरक्षा मोहिमेची पूर्वतयारी म्हणून आजपासूनच त्याचा अंमल सुरू झाला आहे. नियम मोडल्यास वेळप्रसंगी कठोर कारवाई म्हणून लायसन्स निलंबित करण्याच्या सूचना आहेत. त्यासाठी दोन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश मोराडे यांनी दिली.
वाहतुकीचे नियम मोडल्यास आता आरटीओकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. १८ जानेवारीपासून राज्यात रस्ते सुरक्षा अभियान सुरू होते. त्याची पूर्वतयारी म्हणून वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात आजपासून १७ जानेवारीपर्यंत विशेष कारवाईची मोहीम हाती घेतली आहे; मात्र या मोहिमेंतर्गत कारवाईसाठी आरटीओंकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. केंद्र शासनाने ३२ वा रस्ता सुरक्षा महिना या वेळी १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केला जाणार आहे.
रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्यादृष्टीने केंद्र शासनाने विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पूर्वतयारी म्हणून १ जानेवारीपासून ही विशेष तपासणी मोहीम हाती घेण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व आरटीओंना दिले आहेत. विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, वाहन चालताना सीटबेल्टचा वापर न करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, अवैध प्रवासी वाहतूक, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, प्रवासी वाहनातून माल वाहतूक करणे, ओव्हरलोड माल वाहतूक करणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे.
वेगाने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, दारू पिऊन किंवा अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवणे, अशा नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. वेळप्रसंगी लायसन्स निलंबित करण्याच्या सूचना आहेत. या मोहिमेसाठी आरटीओ कार्यालयातील तीन वाहन निरीक्षकांची निवड करावी व तपासणीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आहेत.
हेही वाचा - महसूल विभागाच्या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक -
"परिवहन आयुक्तांच्या सूचनेनुसार आम्ही आजपासून कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी दोन भरारी पथके नियुक्त केली आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे."
- अविनाश मोराडे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.