पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची शपथ घेताना मी प्रधान सेवक म्हणून काम करणार, अशी ग्वाही दिली होती.
कुडाळ : कुडाळचे पुढचे आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) असतील. तुम्ही त्यांना साथ द्या, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव घाटचे पेड पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात केले. तालुक्यातील अणाव-घाटचे पेड या पुलाची उंची वाढवणे या विकासकामाचा लोकार्पण सोहळा काल येथे झाला.
या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री चव्हाण व माजी खासदार राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश सदस्य दत्ता सामंत, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, युवा उद्योजक विशाल परब, अणाव सरपंच लिलाधर अणावकर, उपसरपंच अदिती अणावकर, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर.
तसेच मंडल अध्यक्ष दादा साईल, ज्येष्ठ पदाधिकारी राजू राऊळ, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, विनायक अणावकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, अजय आकेरकर, अधीक्षक अभियंता छाया नाईक, अजय सर्वगोड, मोहन सावंत, रुपेश कानडे, प्रज्ञा राणे, पप्या तवटे, तेजस माने, साधना माड्ये आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, ‘‘विकासाची तळमळ असणाऱ्या नेत्याला साथ देण्याची आपली जबाबदारी असते. या मतदारसंघामध्ये यापुढे माजी खासदार राणे हे आमदार म्हणून उभे राहणार आहेत. तुम्ही त्यांना साथ द्या. त्यांच्यामध्ये काम करण्याची तळमळ, पाठपुरावा करण्याची धावपळ आहे, ती या ठिकाणच्या आमदारांमध्ये नाही. महाविकास आघाडीच्या काळात निधीअभावी रखडलेल्या विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारने चालना दिली. भावनिक आवाहनावर विकास होत नसतो. समविचारी पक्षाच्या सरकारला पाठिंबा देऊन आपल्या गावाचा विकास करायचा असतो.’’
पालकमंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची शपथ घेताना मी प्रधान सेवक म्हणून काम करणार, अशी ग्वाही दिली होती, त्याचप्रकारे लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे. या पुलाचे काम महाविकास आघाडीमुळे रखडले होते. नाबार्डमधून मंजूर झालेले हे काम ‘महाविकास’ सरकारने रखडून ठेवले.
राज्याचा आवश्यक असलेला निधी त्याला दिला नाही; मात्र शिंदे-फडणवीस सरकारने निधी दिला आणि त्यामुळे हे पूल आता पूर्णत्वास जाऊ शकले.’’ दरम्यान, यावेळी बाळकृष्ण पालव, अशोक पालव, मधुकर परब, गोपाळ पालव, योगेंद्र पालव, साबाजी पालव, दिलीप पालव, सचिन पालव, लक्ष्मण पालव, हरिश्चंद्र परब, नरेश परब या जमीनमालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे कुडाळ-मालवण विधानसभा प्रभारी नीलेश राणे म्हणाले, ‘‘खऱ्या अर्थाने २०१४ नंतर पुन्हा एकदा विकासाची गंगा पालकमंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून दिसून येत आहे. या पुलाचे रखडलेले काम मार्गी लागले. भाजप पक्षामध्ये जे ग्रामस्थ प्रवेश होत आहेत, हे कामाच्या प्रभावावर आहेत.
आम्ही शाश्वत विकासाचा विश्वास देत आहोत, म्हणूनच लोक आमच्याकडे येत आहे. या मतदारसंघाचा विकास टप्प्याटप्प्याने आम्ही करणार आहोत. वेगवान पद्धतीने काम करणारे पालकमंत्री जिल्ह्याला भेटले आहेत. गणेश चतुर्थीपूर्वी महामार्गाचा एक मार्ग पूर्ण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.