'पुढील वर्षात रत्नागिरीकर चालणार गुळगुळीत रस्त्यावरुन'

Uday Samant
Uday SamantSakal
Updated on
Summary

'विरोधकांनी फक्त खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करू नये, अन्य सर्व विकासकामांबद्दलही बोलावे'

रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्डे पडले आहेत. हे भयावह आहे, आम्ही ही परिस्थिती नाकारत नाही; परंतु रत्नागिरीचा विकास शिवसेनेच्या माध्यमातूच होणार आहे. येत्या एक जानेवारीला नागरिक घराबाहेर पडतील; तेव्हा ते गुळगुळीत रस्त्यावरूनच जातील. या कामात आचारसंहितेचा अडथळा येणार नाही. पाऊस थांबताच महिन्यात रस्त्यांचे काम सुरू होणार आहे, असा ठाम दावा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केला. विरोधकांनी फक्त खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करू नये, अन्य सर्व विकासकामांबद्दलही बोलावे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना हाणला.

झूमद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, नळपाणी योजना, गॅसलाईन, बीएसएनएल व रिलायन्स केबल यामुळे शहरात चरी खोदलेल्या आहेत. रत्नागिरीत खड्डे पडले आहेत; परंतु पावसाने सरासरी पार केली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडुजी करता आली नाही. पाऊस कमी झाल्यावर पुढील एका महिन्यात सर्व रस्ते चकाचक होतील. काही लोक माझ्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ मिक्सिंग करून पाठवत आहेत; परंतु या विरोधकांना रस्ते चकाचक झाल्यावर चपराक बसेल. शहराचा विकास शिवसेनेच्या माध्यमातूनच होईल.

Uday Samant
शेतकऱ्याने दिली ऑफर! ..तर राज्यकर्त्यांना एक एकर बागायत जमीन

ते म्हणाले की, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था पाहा. मी मंत्री गडकरी किंवा पंतप्रधान मोदी यांना दोष देत नाही. काही लोक महामार्गावर बोलत नाहीत, तर फक्त शहरात आल्यावर खड्डे दिसतात त्यावर बोलतात. कृपा करून सर्व गोष्टीत राजकारण करू नका. शहराच्या विकासासाठी आम्ही आराखडा आखला असून, तो सत्यात उतरवण्याचे काम करतोय. आम्ही जी कामे ठरवली आहेत ती पूर्ण केली आहेत. विरोधकांनी झालेल्या कामांबद्दल बोलले पाहिजे.

... तर रस्त्यावरून चालू नका

महिन्यानंतर रस्ते गुळगुळीत झाले तर विरोधकांनी त्यावरून चालू नये, कारण शिवसेनेने केलेल्या रस्त्यांवर त्यांना चालावे लागेल. पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली, तरी ५६ कामांच्या साडेबारा कोटींच्या निविदा निघाल्या आहेत. त्यामुळे ती कामे पूर्ण होणारच. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच खड्ड्यांबाबत जास्त टीका होत असल्याच्या प्रश्नावर सामंत म्हणाले, निवडणूक आली की बदनाम करायचे, हे योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आहे, ते आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर सूचना करू शकतात.

Uday Samant
'OBC आरक्षण न मिळाल्यास केंद्रसरकारच जबाबदार'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()