कहो दिल से... निलेश राणे फिरसे!

Nilesh Rane
Nilesh Rane
Updated on

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून खासदारकी नाव घोषित करण्यात आलेल्या निलेश राणे यांना पाठिंबा देणारे फलक जिल्ह्यात झळकू लागले आहेत. यात  कहो दिल से... निलेश राणे फिरसे.. असा संदेश देण्यात आला आहे  

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सिंधूदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून डॉक्टर निलेश राणे यांचे नाव एकमताने जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी राणे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते युवा असल्यामुळे त्यांचा लोकसंपर्क दांडगा होता मध्यंतरीच्या काळात शिवसेनेच्या विनायक राऊत यांचा विजय झाल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता पुन्हा एकदा लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत एकमताने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे यांच्या नावाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकमताने नाव दिल्यानंतर आतापासूनच त्यांना पाठिंबा देणारे फलक जिल्ह्यातील मुख्य रस्त्यावर झळकू लागले आहेत. सध्यस्थिती लक्षात घेता राणे यांच्याविरोधात शिवसेनेच्या विनायक राऊत यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. नानांच्या मुद्द्यावरून आपल्याला लोकांचा पाठिंबा मिळेल. रोजगार महत्त्वाचा असल्यामुळे आपण प्रसंगी अपक्ष राहण्याची तयारी जठार यांनी दाखवली आहे. त्यामुळे त्या दोघांसह काँग्रेस-राष्ट्रवादीमधील एखादा चेहरा निलेश राणे यांच्या विरोधात दिसणार आहे तूर्तास मात्र राणे यांचे नाव चर्चेत आहे. राणे यांनी यापूर्वी पाच वर्षे खासदारकी सांभाळली आहे. यात स्वतः खासदार व वडील माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे मंत्री असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यात विकासाचे प्रकल्प आणले होते. मोठ्या प्रमाणात निधी आणला होता झाराप-पत्रादेवी महामार्गाचे चौपदरीकरण जिल्ह्यात काही महत्त्वाच्या रेल्वे ना थांबा असे विविध प्रश्न त्यांनी आपल्या काळात मार्गी लावले होते. त्याचबरोबर युवकांचे प्रेरणास्थान म्हणून निलेश राणे यांची लोकसभा मतदारसंघात क्रेझ आहे. त्याचा फायदा येणाऱ्या काळात त्यांना होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र साबण पक्षाच्यावतीने जिल्ह्यातील तीन विधानसभा निवडणुकांत सोबत लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली आहे. तशा प्रकारचे संकेत खुद्द पक्षाचे नेते नारायण राणे यांनी दिले आहेत त्यामुळे आता लोकसभे समवेत विधानसभा सुद्धा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने नारायण राणेंची व्यूहरचना असणार आहे त्यामुळे त्यात आता राणेंना कितपत यश मिळते याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.